मुंबई : राज्यात काल(२५ सप्टेंबर) आणि आज(२६ सप्टेंबर) रोजी आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा घेतली जाणार होती. पण ऐनवेळी ही परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली. या परीक्षा पुढे ढकलल्याची माहिती शुक्रवारी रात्री नऊ वाजता राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.
दरम्यान, विरोधकांसह विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागल्यानंतर राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातर्फे माफी मागितली होती. तर, आज मुंबईत राजेश टोपे यांनी भाष्य करताना या परीक्षेच्या नव्या संभाव्य तारखांबाबत देखील भाष्य केलं आहे. ‘विद्यार्थ्यांच्या हितासाठीच ही परीक्षा पुढे ढकलली आहे. ही परीक्षा रद्द नाही तर लांबणीवर टाकण्यात आली आहे. आरोग्य विभागाची बैठक घेऊन पुढील तारखा ठरवू आणि पुढील तारीख लवकरच कळवली जाईल,’ असं टोपे म्हणाले.
यासोबतच, ‘साधारणपणे 15, 16 ऑक्टोबर किंवा 22, 23 ऑक्टोबरला या परीक्षा होण्याची शक्यता आहे. या संभाव्य तारखा असतील. शाळा सुद्धा सुरु होणार आहेत. त्यामुळे त्यांचं नियोजन बघून तारखा ठरवल्या जातील, अशीही माहिती टोपे यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांच्या व्यथा –
तर, परीक्षांच्या आयोजनाबाबत राज्य सरकारचा गोंधळ कायम असून त्यामुळे जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. परीक्षार्थी हे घरातील आर्थिक स्थिती बेताची असताना एसटी, रेल्वे यांचे तिकीट काढून परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी रवाना झाले होते. मात्र, रस्त्यात असताना अचानक परीक्षा रद्द झाल्याचे टोपे यांनी जाहीर केल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होण्यासह परीक्षेसाठी घेतलेली मेहनत देखील वाया गेली आहे. ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल असं जरी सांगण्यात आलं असलं तरी आता निर्माण झालेलं मानसिक दडपण, आर्थिक नुकसान याला राज्य सरकारचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही- सी. टी. रवी
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- ‘कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत’; संयुक्त राष्ट्राच्या सभेतील मोदींच्या भाषणावर चिदंबरम यांची टीका
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- …म्हणून मी शिवसेना सोडली; भुजबळांनी सांगितलं कारण

