मुंबई : येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात युएई येथे टी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेसोबतच भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. यानंतर भारतीय क्रिकेट बोर्डाला नवीन प्रशिक्षकाचा शोध घ्यावा लागणार आहे.
यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटु इरफान पठानने नॅशनल क्रिकेट अकादमीत प्रशिक्षकाचा कोर्स पुर्ण केला आहे. प्रशिक्षकाचा कोर्स पुर्ण होताच त्याने प्रशिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र ही इच्छा त्याने भारतीय संघासाठी नव्हे तर आयपीएल संघासाठी बोलुन दाखवली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना त्याने ही इच्छा व्यक्त केली. यावेळी बोलताना तो म्हणाला, ‘मागील तीन वर्षापासून मी प्रशिक्षक म्हणून काम बघतोय. मात्र एनसीएमध्ये प्रशिक्षकाचा कोर्स पुर्ण करताना मला क्रिकेटचा प्रत्येक पैलु अधिक खोलवर समजतो. यात मला माझ्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचादेखील फायदा झाला’ असे तो म्हणाला.
यावेळी त्याने राहुल द्रविडसारखा दिग्गज एनसीएमध्ये असणे भारतीय क्रिकेटसाठी मोठी गोष्ट आहे. त्याने १९ वर्षाखालील आणि इंडिया एच्या खेळाडूंना तयार केले. आठ दिवसाच्या या कोर्सनंतर मला एखाद्या आयपीएल संघाला प्रशिक्षण द्यायला आवडेल असे इरफान पठाण म्हणाला. इरफान पठाणच्या या हाकेला ओ कोणता आयपीएल संघ देतो याकडे सर्वाचे लक्ष्य असणार आहे. तसेच भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी देखील तो रस दाखवतो का याची उत्सुकता क्रिकेट रसिकांना लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानच्या आक्रमणानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय
- राज ठाकरे यांचं म्हणणं पूर्णपणे सत्य- प्रवीण दरेकर
- पंकजा तर होत्याच, पण आता नाना पटोलेंच्या भूमिकेमुळेही धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली
- ‘जो स्वत: सांड आहे तो दुसऱ्याला सांड म्हणतोय’, रावसाहेब दानवेंवर पलटवार
- ‘राहुल गांधी हे देवाला सोडलेले वळू’, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

