नवी दिल्ली : तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. त्यानंतर अफगाणी अफगाणिस्तानमधून पळ काढत आहेत. त्यातच आता तालिबान्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणं १४ भारतीयांना चांगलंच महागात पडलं आहे. तालिबानांच्या समर्थनात सोशल मीडियावर पोस्ट लिहिण्याच्या आरोपाखाली आसामधील वेगवेगळ्या भागातील १४ जणांना अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री हे अटकसत्र सुरु करण्यात आलं आहे.
तालिबानंचं समर्थन करणाऱ्या पोस्ट लिहिणाऱ्या सर्व आरोपींवर बेकायदेशीर वर्तन, आयटी अॅक्ट आणि सीआरपीसी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आरोपींनी देशातील कायद्यांचं उल्लंघन केलं आहे. म्हणून आसाममधील १४ जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. आसाम पोलिसांनी लोकांना दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट करणे या गोष्टी राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात असल्याने असा पोस्ट करणाऱ्यांवर आसाम पोलिसांची करडी नजर आहे. तालिबानी समर्थनार्थ केलेल्या पोस्टबाबत कारवाई करत असल्याचे उप महानिरीक्षक वायलेट बरुआ यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गळफास घेण्यासाठी मला दोरंखड देण्याची मागणी झाली होती,’ परवेज रसुलचा खळबळाजनक दावा
- मराठा मुक आंदोलनप्रकरणी नांदेडमध्ये २१ जणांवर गुन्हा दाखल
- एनसीएमध्ये प्रशिक्षण पुर्ण करताच इरफान पठानने व्यक्त केली ‘ही’ इच्छा
- राज ठाकरे यांचं म्हणणं पूर्णपणे सत्य- प्रवीण दरेकर
- पंकजा तर होत्याच, पण आता नाना पटोलेंच्या भूमिकेमुळेही धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

