मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस हा वाद आता चिघळताना दिसत आहे. राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे राज्यात जातीपातीचं राजकारण वाढल्याचं विधान केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. तर आता भाजपने राज ठाकरेंच्या सुरात सूर आता मिसळला असल्याचे पाहायला मिळत आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यावर दोनच शब्दात उत्तर दिलं आहे. राज ठाकरे यांचं म्हणणं पूर्णपणे सत्य आहे, असं प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आधीच मनसे आणि राष्ट्रवादीत जुंपलेली असताना त्यात दरेकरांची एन्ट्री झाल्याने पुन्हा एकदा हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या विधानामुळे दोन्ही पक्षातील वाद वाढतच आहेत. यातच आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे.
नाव राष्ट्रवादी आणि राजकारण संकुचित असलेल्या लोकांनी आम्हाला राष्ट्रद्रोही म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरीच आहे. महाराष्ट्रात जाती जातीत विष कालवणारे महाराष्ट्र द्रोहीच. राष्ट्रवादीने महाराष्ट्रात जातीचे विष पेरले. अशा दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंवर बोलू नये असा इशाराही संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होतेय, मात्र तरीही नागरिकांनी नियमांचे पालन करावे’
- पंकजा तर होत्याच, पण आता नाना पटोलेंच्या भूमिकेमुळेही धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली
- ‘जो स्वत: सांड आहे तो दुसऱ्याला सांड म्हणतोय’, रावसाहेब दानवेंवर पलटवार
- ‘राहुल गांधी हे देवाला सोडलेले वळू’, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘आगामी लोकसभा निवडणूक भाजपविरोधात एकत्रच लढवूयात!’, सोनिया गांधींचे विरोधी पक्षांना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

