नांदेड : काल नांदेड शहरात मराठा आरक्षणासाठीच्या मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाची भूमिका मांडली होती. दरम्यान आता मराठा आरक्षणासाठी विनापरवाना मुकआंदोलन करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शुक्रवारी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासाठी मुक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आयोजकांनी जनसमुदाय एकत्र जमवून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढेल, असे घातक कृत्य केल्याने गुन्हे दाखल झाले आहेत. मराठा मूक आंदोलन प्रकरणी 21 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोव्हिड काळात गर्दी जमवल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वजिराबाद पोलिस ठाण्यात हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
मराठा समाजाच्या मनातील खदखद दाखविण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा समाजाने जमून एकी दाखवली. आरक्षणासह इतर प्रश्न सोडविण्यासाठी मराठा बांधव छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात आक्रमक होताना दिसले. एकिकडे सर्व राजकीय पक्षांचे सभा, मेळावे, आंदोलन होत असताना मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हा दाखल झाल्याने संभाजी छत्रपती यांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एनसीएमध्ये प्रशिक्षण पुर्ण करताच इरफान पठानने व्यक्त केली ‘ही’ इच्छा
- राज ठाकरे यांचं म्हणणं पूर्णपणे सत्य- प्रवीण दरेकर
- पंकजा तर होत्याच, पण आता नाना पटोलेंच्या भूमिकेमुळेही धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली
- ‘जो स्वत: सांड आहे तो दुसऱ्याला सांड म्हणतोय’, रावसाहेब दानवेंवर पलटवार
- ‘राहुल गांधी हे देवाला सोडलेले वळू’, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

