मुंबई : शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे वाद काही नवा नाही. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यासहीत त्यांच्या कुटुंबियांवरही टीका केली आहे. सिंधुदुर्ग येथे झालेल्या एका जाहीर कार्यक्रमामध्ये विनायक राऊत यांनी नारायण राणेंना आणि त्यांच्या मुलांना येथील जनतेने अनेकदा पराभूत केल्याचा उल्लेख करतानाच हिंमत असेल तर पुढील विधानसभा येथून लढवून दाखवावी. डिपॉझिट जप्त झालं नाही तर नाव लावणार नाही, असं थेट आव्हान दिलं आहे.
नारायण राणेंनी हिंमत असेल तर पुन्हा वैभव नाईक यांच्यासमोर कुडाळ, मालवणमधून निवडणुक लढवून दाखवावी. नाही त्यांच डिपॉझीट जप्त केलं तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही. हिंमत असेल तर रहा उभे विधानसभेला, असं म्हणत राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणेंना दाखवून दिलं आहे. दोनदा यांच्या पोराला आपटलं आणि एकदा यांना आपटलं, असंही राऊत म्हणाले आहेत.
दिल्लीकरांना चांगलं वाटलं पाहिजे, मोदींना, अमित शाहांना चांगलं वाटलं पाहिजे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर राणे नको त्या शब्दात टीका करतात असा आरोपही यावेळी राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- उद्या सकाळी 10 वाजता हायड्रोजन बॉम्ब फोडणार- नवाब मलिक
- देवेंद्र फडणवीसांना आमच्याविरोधात माहिती देणारे कच्चे खेळाडू- नवाब मलिक
- ये तो हसीना का नवाब निकला….; फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपची टीका
- अंडरवर्ल्डशी संबंधित जागांच्या व्यवहारात नवाब मलिकांचा सहभाग; फडणवीसांनी दिले पुरावे
- ‘आ रहा हूँ मैं’, मलिकांचा फडणवीसांना सूचक इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

