सिंधुदुर्ग : आधी हाय होल्टेज ड्रामा आणि पहाटेपर्यंत रंगतदार झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि महाविकास आघाडीचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहेत. या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी भाजपाकडून धनंजय महाडिक यांचा विजय तर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. यानंतर भाजपाकडून राज्यभरात जल्लोष करण्यात येत आहे. तसेच या पराभवाच्या निमित्त साधून भाजपाचे अनेक नेते महाविकास आघाडीवर जोरदार निशाण साधताना दिसत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारपरिषेदेत बोलत होते.
“आजपर्यंतच्या इतिहासात मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीने जी भाषा वापरली नाही त्या भाषेत उद्धव ठाकरे बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करत होते. आम्ही वाघ आहोत, अमूक आहोत, तमूक आहोत असे म्हणत होते. जी भाषा वापरायला नको होती ती भाषा वापरल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाचक्की आणि बेअब्रुपण झाली,” अशा शब्दात नारायण राणे यांनी टीका केली आहे.
यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनाम्याची मागणी केली. “शिवसेना म्हणत होती की तीन जागा जिंकणार पण शेवटी काय झालं? संजय राऊतदेखील काठावर पास झाले. आमच्या हातून संजय राऊत वाचले. ते सत्तेत आहेत. त्यांना महाविकास आघाडीची मते मिळायला हवी होती. तेवढीही मते त्यांना मिळली नाहीत. मला सांगायचं आहे की तुम्ही अल्पमतात आलेले आहात. नैतिकतेचं भान असेल तर राजीमाना द्या आणि बाजूल व्हा,” असे नारायण राणे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

