Share

‘न्याय मागण्यासाठी गेलो तर पोलिसांनी कुत्र्यासारखे हाकलून लावले’

Published On: 

औरंगाबाद: चार महिन्यापासून मला पगार नाही, कंपनीने मला रस्त्यावर उतरविले, न्याय मागण्यासाठी पोलिसाकडे गेलो तर, तुला जे करायचं ते कर तुला पोलीस मदत करू शकत नाही, असे म्हणत वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी मला कुत्र्यासारखे मला बाहेर काढले. असा आरोप करत एक कामगार वाळूज एमआयडीसी परिसरातील एक कंपनी समोर उपोषणास बसला आहे.

इंडिको रेमेडीज लिमिटेड या कंपनीत किरण दिगंबर गिरी हा कामगार काम करत होता.त्याला कंपनी व्यवस्थापने कोणतेही कारण न देता कंपनीतून काढून टाकल्याचा त्याचा आरोप आहे. तर पोलीसानीही त्याला हाकलून दिल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याने कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कंपनी व्यवस्थापनाच्या दोन जणांनी संगनमत करून मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यास भाग पाडले.

तसेच काही एक ऐकून न घेता कामावरून कमी केले. त्यामुळे विषारी द्रव्य प्राशन करून कंपनीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्या नंतर गिरी कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी निवेदन दिले मात्र न्याय मिळत नाही, सीपी ला भेटलो, गृहमंत्र्यांना पत्र लिहील पण कोणीच लक्ष दिले नाही. कंपनी मालक, व्यवस्थापकासह पोलिसाकडून सुद्धा माझ्या जीवाला धोका आहे असा आरोप करत किरण गिरी याने गुरुवार (४) पासून कंपनी च्या गेट समोर आमरण उपोषण सुरू केले. यावेळी त्याचे कुटुंब ही उपस्थित होते. जर न्याय मिळाला नाहीतर मी कुटुंबासह कंपनीसमोर आत्मदहन करेल असा इशाराही गिरी यांनी दिला आहे.

याविषयी वाळूज एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्याशी बोललो असता त्यांनी सांगितले की, ही सत्य आहे कि त्याला पोलीस या प्रकरणात कोणतीही मदत करू शकत नाही कारण हे प्रकरण कामगार आयुक्ताचे आहे, त्याने तिकडे दाद मागायला हवी. तो चुकीच्या ठिकाणी न्याय मागत आहे. राहिला विषय त्याचा आरोपाचा तर लोकशाही आहे. कोणी कोणावर कोणतेही आरोप करू शकतात. पोलीस हे रक्षण करण्यासाठी आहे, कोणाचा जीव घेण्यासाठी नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!