Share

पुणे तिथे काय उणे ! केंद्र सरकारच्या राहण्यायोग्य शहराच्या यादीत पुण्याचा दुसरा क्रमांक

Published On: 

पुणे : काही महिन्यांपूर्वी ‘इंडियन सिटीज हॅपीनेस रिपोर्ट २०२०’ च्या रिपोर्टनुसार पुण्याने देशात १२ वे तर राज्यात अव्वल स्थान पटकावले होते. आता केंद्र सरकारने राहण्यायोग्य सर्वोत्तम शहरांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार देशातील १११ शहरांपैकी राहण्यायोग्य म्हणजेच Ease of Living (दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेलं शहर) मध्ये कर्नाटकची राजधानी व टेक-हब म्हणून देशात नावारूपाला आलेल्या बंगळुरु या शहरांना अव्वल स्थान पटकावलं आहे.

तर, विद्येचे माहेरघर तर राज्यातील आयटी नगरी म्हणून नावाजल्या जाणाऱ्या पुणे शहराने दुसरं स्थान पटकावलं आहे. यासोबतच, देशातील १११ शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील ३ शहरांचा समावेश आहे. या सर्वेक्षणात प्रशासन, शिक्षण, स्वच्छता आणि सुरक्षा यांसारख्या बाबींचा विचार केला जातो. हे सर्वेक्षण २०१८ मध्ये पहिल्यांदा करण्यात आले होते.

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला टॉप-१० मध्ये देखील स्थान मिळालेलं नाही. दरम्यान, चेन्नई, सूरत, नवी मुंबई, कोयंबतूर,बडोदा, इंदूर आणि ग्रेटर मुंबईचा समावेश पहिल्या १० शहरांमध्ये करण्यात आले आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही यादी जाहीर केली. दरम्यान, ’10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहराच्या’ श्रेणीत शिमला अव्वल स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!