Share

घोडयावरून येण्यास तयार असलेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्याचे पुन्हा एक पत्र, म्हणाला..

Published On: 

औरंगाबाद :पाठीचा कण्याच्या दुखण्यामुळे घोडा खरेदी करण्याची आणि त्याला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे रोहयो विभागात सहायक लेखाधिकारी पदावर कार्यरत असलेले सतीश पंजाबराव देशमुख यांनी केली होती, परंतु अखेर देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालायाच्या आवारात घोडा बांधण्याची आपली मागणी मागे घेत, माफीनामा सादर केला आहे.

घोड्यावर येण्याच्या परवानगीचे पत्र समाज माध्यमावर तुफान व्हायरल झाल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली. अशा प्रकारची विनंती करणाऱ्या पत्राबाबतच्या वृत्ताला निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी देखील दुजोरा दिला. तर, सतीश देशमुख यांच्या मागणीवर वैद्यकीय अधिष्ठातांचा अभिप्राय मागवला गेला. अस्थिव्यंग विभागाने पाठीच्या कण्याच्या दुखण्यावर दुचाकीऐवजी घोड्यावर बसून कार्यालयात येणे, हा उपाय संयुक्तिक नसल्याचा अभिप्राय दिला. तो अधिष्ठातांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठवला.यानंतर या सतीश देशमुख यांनी त्यांची मागणी मागे घेत माफीनामा सादर केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

दरम्यान, आपण ऑफिसला येताना घोड्यावर येण्याचा विचार करत असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये मला घोडा बांधण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी सहाय्यक लेखाधिकारी असणाऱ्या सतीश देशमुख यांनी केली होती. ३ मार्च रोजी हे पत्र लिहिण्यात आलं आहे. “कार्यलयीन परीसरामध्ये घोडा बांधण्याची परवानगी मिळण्याबद्दल’, असा या पत्राचा विषय आहे.

‘उपरोक्त विषयी विनंती करण्यात येते की मी सतीश पंजाबराव देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कार्यरत आहे. मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे टू व्हिलरवर येण्यास त्रास होतो. त्यामुळे मी घोडा खरेदी करण्याचे ठरविले आहे. घोड्यावर बसून विहीत वेळेत कार्यालयामध्ये येणे मला शक्य होईल व घोडा आणल्यास त्याला बांधण्यासाठी कार्यालयीन परिसरात परवानगी देण्यात यावी, ही विनंती ” असा मजकूर या पत्रामध्ये आहे. तसेच या पत्राची एक प्रत रोहयोच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्याचेही पत्रामध्ये नमूद केलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!