Share

औरंगाबाद मनपाला जिल्हा परिषदेचा विरोध ?

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद महानगर पालिका ही ‘क’ दर्जाची आहे. त्यात वाळूज एमआयडीसी परिसरातील ग्रामपंचायत महानगर पालिकेत समाविष्ट केल्या तर सध्या महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांनाच सुविधा न देऊ शकणारी महानगर पालिका आम्हाला काय सुविधा देनार? वाळूज भागातील ग्रामपंचायती त्यांचा विकास करण्यासाठी महानगपालीकेपेक्षा सक्षम आहे. त्यामुळे त्यांचा औरंगाबाद मनपात समावेश करू नये असा ठराव जिप सदस्य रमेश गायकवाड यांनी स्थायी समितीत मांडला. यामुळे जिल्हापरिषदेत मनपाला विरोध अशी परीस्थिती निर्माण झाली आहे.

गरूवार (४) रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी वाळूज एमआयडीसी परिसरातील ग्रामपंचायत महानगरपालिकेत न घेण्यासाठी गायकवाड यांनी ठराव मांडला त्यास मधुकर वालतुरे यांनीसमर्थन देत. हा ठराव राज्य शासनाकडे पाठवण्याचा आग्रह धरला. हा ठराव मांडताना गायकवाड म्हणाले कि, वाळूज एमआयडीसी परिसरातील पंढरपूर, वळदगाव, वाळूज, रांजणगाव शेपू, वडगाव को, बजाजनगर आदी ग्रामपंचायती मनपा पेक्षा उत्तम रीतीने काम करत आहे त्याचा मोठ्या प्रमाणात विकास देखील झाला आहे.

या ग्रामपंचायती त्यांचं विकास करण्यास सक्षम असून मनपात घेऊन त्यांचे नुकसान करू नये. मनपा प्रशासन विकास करण्यास असमर्थ आहे, याचे उदाहरण म्हणजे सातारा, देवळाई, मिटमिटा, करमाड याना मनपात समाविष्ट केल्यानंतर त्यांचा विकास काय आहे ? आजपर्यंत त्यांचा विकास आराखडा देखील तयार नाही. वाळूज एमआयडीसी परिसरातील ग्रामपंचायत जर मनपात घेण्याचे ठरवले तर छावणी परिसरामुळे प्रभाग रचना देखील करता येणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने ग्रामपंचायत मनपात समाविष्ट करण्याचा निर्णय मागे घ्यावा असा ठराव सभेत मांडला. या ठरावाला वालतुरे यांनी समर्थन दर्शवत सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.

या सभेत जिप उपाध्यक्ष एल जी गायकवाड, शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश गलांडे, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, जिप सदस्य रमेश गायकवाड, मधुकर वालतुरे, शिवाजी पाथ्रीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे आदीसह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!