Share

कोरोनाचा परिणाम! ग्रामीण भागातील शाळा २० मार्चपर्यंत बंद

Published On: 

औरंगाबाद : काही दिवसापूर्वी शहरातील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. ग्रामीण भागातील कोरोन प्रभाव वाढल्याने शहराप्रमाणेच ग्रामीण भागातदेखील इयत्ता ५वी ते ११वी पर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत. यातून इयत्ता १०वी व १२वीच्या वर्गांना मात्र वगळण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना शाळेपासून सुटका मिळाली आहे. तर शिक्षकानाही एक दिवसाआड जाण्यास मुभा मिळाली आहे.

प्रतिबंधात्मक साथरोग कायद्यांतर्गत हे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा २० मार्च पर्यंत बंद राहतील. मात्र ऑनलाईन वर्ग पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील. इयत्ता १०वी व १२वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांची दररोज थर्मल गन व ऑक्सिमीटरने तपासणी करून विदयार्थ्यांची नोंद ठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व शिक्षकांना दर आठवड्याला आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक राहील. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीपैकी कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास सदरील शैक्षणिक आस्थापना चार दिवस बंद राहील.

यानंतर सर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणीनंतर ती निगेटिव्ह आल्यासच शाळा सुरु करण्यात येईल. इयत्ता १०वी व १२वी च्या वर्गासाठी कोव्हीड १९ अनुषंगाने शासनआदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील. इयत्ता १०वी व १२वी वर्ग सोडून इतर वर्गातील शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती अनिवार्य राहणार असून १०० टक्के उपस्थितीबाबत शाळांनी आग्रह धरू नये असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, शाळा सॅनिटायझिंग करणे या आदेशांचे प्रकर्षाने पालन करण्याबाबत आदेशात नमूद करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!