औरंगाबाद :साठ वर्षांवरील जेष्ठांसह इतर आजार असलेल्या नागरिकांसाठी सोमवारपासून महापालिकेच्या वतीने कोरोना लस देण्यास प्रारंभ झाला. शहरातील सर्वच केंद्रांवर चार दिवसांपासून जेष्ठांसह इतर आजार असलेल्या नागरिकांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे. सर्व केंद्रांवर नागरिकांनी रांगा लावून कोरोनाचा पहिला डोस घेतला. यात तरुणानांही लाजवेल असा जेष्ठांचा उत्साह यावेळी दिसून आला. आज ११४९ जेष्ठांनी लस घेतली.
या अनुषंगाने आज (दि. ४) ६० वर्षांवरील ११४९ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. ४५ ते ५९ वर्षे पर्यंतच्या आजारी असलेल्या १९० लाभार्थ्यांना मिळून एकूण १३३९ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तसेच २९५ हेल्थ केअर वर्कर यांना पहिल्या टप्प्याचे व ५३४ हेल्थ केअर वर्कर्स यांना दुसऱ्या टप्य्याचे लसीकरण करण्यात आले. १७८ फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीकरण करण्यात आले.
महानगरपालिकेच्या वतीने शहरातील १३ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. यात सिडको एन-८ , सिडको एन-११, बन्सीलाल नगर आरोग्य केंद्र , छावणी हेल्थ सेंटर, जिल्हा रुग्णालय, इएसआयसी रुग्णालय, सीएसएमएसएस रुग्णालय, सादात नगर आरोग्य केंद्र, शिवाजी नगर आरोग्य केंद्र, राज नगर आरोग्य केंद्र, बायजीपुरा आरोग्य केंद्र आयएमए हॉल, दंडे हॉस्पिटल एन-२ या केंद्राचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पोलिसाने अत्याचार केलेल्या ‘त्या’ महिलेची आत्महत्या
- ‘नियोजन होत नसेल तर दीडशे कोटी कोरोनाला द्या’
- औरंगाबाद मनपाला जिल्हा परिषदेचा विरोध ?
- प्राध्यापिकेला व्हाट्स अपवर ‘तो’ मेसेज करणाऱ्या प्राध्यापकाला ५ वर्षांची सक्तमजुरी
- परीक्षा ऑनलाईन देणार की ऑफलाईन? माहिती द्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

