लातूर: जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे तसेच आता कोविड ग्रामीण भागातही धुमाकूळ घालत असल्याने चिंतेचे वतावरण तयार झाले आहे. येथील गातेगाव तालुक्यातील एकूण २८ गावांत आजपर्यंत ३५७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आता याला रोखण्यासाठी सर्वपरिणे प्रयत्न सुरू आहेत. गावात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय सुनील यादव यांनी दिली आहे.
गावात विनाकारण विनामास्क फिरु नका, घरात सुरक्षित रहा. गावात माणसे गोळा करुन बैठकांचा फड मांडू नका. अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी सुनील यादव यांनी दिला आहे. या २८ गावांतील ग्रामसेवक, पोलिस पाटील व तलाठी यांची शनिवारी गातेगाव जि. प. शाळेत बैठक घेऊन उपायोजना करण्यातबाबत सूचना देण्यात आल्या, यावेळी ते बोलत होते.
गातेगाव मंडळात २०० व चिंचोली मंडळात १५७ रुग्ण आहेत. त्या पार्श्वभमीवर कोणीही गावात मोकाट फिरत असेल तर, दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश या बैठकी दरम्यान यादव यांनी दिले आहेत. कोणाच्या घरी वा कोणाच्या संपर्कात जाऊ नका, याची अंमलबजावणी कठोर पध्दतीने करा. तसेच या २८ गावांत ॲन्टी कोरोना फोर्स स्थापन करुन उपायोजना करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांच्या आवाहनाला ‘या’ कारखान्याचा प्रतिसाद; सुरु करणार ऑक्सिजन निर्मिती
- बीडच्या आडस ग्रामस्थांचा पुढाकार; कोरोनाला रोखण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय
- दुचाकीवर दारूची वाहतूक करणारे दोघे जेरबंद
- विनामास्क फिरणाऱ्यांकडून ५० हजाराचा दंड वसूल
- परळीत ५० बेडचे कोविड केंद्र सुरू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

