पुणे : महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्वाचा वाटा असणारे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अधिक सक्रिय करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मेळावे व बैठका घेत आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या दोन महापालिका म्हणजेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका याकडे आपला मोर्चा वळवला आहे.
‘पिंपरी चिंचवड आणि पुण्यात शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे,’ अशी गर्जना संजय राऊत यांनी केली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड नंतर पुण्यात देखील संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन महत्वाच्या सूचना केल्या आहेत. तर, काहींचा चांगला समाचार देखील त्यांनी घेतला.
यावेळी शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी स्थानिक पातळीवर आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नसल्याचं विधान केलं. यावर संजय राऊत यांनी भाष्य करताना नेत्यांसह शिवसैनिकांना महत्वाचं आवाहन केलं आहे. ‘ इतरांसारखं शिवसेना कुणाला वाऱ्यावर सोडत नाही. विजय शिवतारे आम्ही तुमच्या मागे आहोत. युती होईल, महाविकास आघाडी होईल. सन्मानाने जागा वाटप झालं तर आपण एकत्र लढू, असं सांगतानाच युती, महाविकास आघाडीमध्ये भांड्याला भांड लागणार. हे नको असेल तर 150 जागा निवडून आणा. जो पर्यंत ते होत नाही तोपर्यंत गोड मानून घ्या,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून धोनीने मानलेल्या भावाला म्हणजेच ब्राव्होला संघाबाहेर ठेवलं
- औरंगाबादेत शिवसेनेच्या माजी महापौरांच्या कन्येची कौतुकास्पद कामगिरी, युपीएससी परिक्षेत ५१९ वा रँक!
- ‘कोणीही टाळ्या वाजवल्या नाहीत’; संयुक्त राष्ट्राच्या सभेतील मोदींच्या भाषणावर चिदंबरम यांची टीका
- गुलाब चक्रीवादळाचा राज्यावरही परिणाम; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
- विद्यार्थ्यांच्या हितासाठीच ‘त्या’ परीक्षा पुढे ढकलल्या; आता टोपेंनी सांगितल्या संभाव्य तारखा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

