🕒 1 min read
मुंबई : राज्याचा कारभार जिथून चालवला जातो, त्या मंत्रालयात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस हे एक रुम आहे. तिथे हे धक्कादायक चित्र आढळून आले.
या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचं कारणही महत्वाचं आहे. जर सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. पण मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा प्रश्न सध्या सर्वच स्तरांतून व्यक्त केला जात आहे.
https://twitter.com/meNeeleshNRane/status/1425016596662308869?s=20
दरम्यान, मंत्रालयातील उपहारगृहाच्या शेजारी दारूच्या बाटल्यांचा खच दिसून आल्याने आता सरकार टीका होऊ लागली आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी याच मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे सरकार असताना मंत्रालयात दारूच्या बाटल्या मिळणार नाही तर काय अगरबत्तीचा स्टॉक मिळणार?? मंत्रालयात कुठल्या स्तराचं काम चालू आहे यावरून लक्षात येते. सरकारची भीती मंत्रालयात सुद्धा राहिलेली नाही, आता हे सरकार फक्त चौकशीचे आदेश देणार आणि माहिती काढणार कोण कुठल्या ब्रँडची पितो अशी टीका त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ही अत्यंत शरमेची बाब; सरकारचा कारभार कोणासाठी, कशासाठी चाललाय हे दिसून येतंय’
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- ऑलिम्पिक विशेष! सप्तपदक मंडळातील दुसरी शिलेदार ‘पी व्ही सिंधु’
- ‘दोन डोस झाले असतील तर आता मंत्रालयात जाणार का?’; भाजपचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
- ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणजे घरच्यांकडून झालेले कौतुक’; पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आशा भोसलेंच्या भावना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
