पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका मुलाखतीवरून सध्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कौतुकापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमुळे जातीय राजकारणामध्ये वाढ झाल्याच्या टीकेपर्यंत राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका मांडली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेससह संभाजी ब्रिगेडने देखील हल्लाबोल केला.
याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भाष्य केलं. निवडणुकांमध्ये जातीय आरक्षण करून मतांच राजकारण केलं जात आहे. अलीकडे यात खूप वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उगमापासून याला सुरुवात झाली होती. आता देखील जातीय आरक्षणावरून आंदोलने सुरु आहेत. त्यातही राजकारण होतंय. त्यामुळे आरक्षण मिळणार नसेल तर स्पष्ट सांगा, माथी भडकवू नका,’ अशी रोखठोक भूमिका घेत राज ठाकरे यांनी दिला आहे.
प्रबोधनकार ठाकरेंचे साहित्य राज ठाकरेंनी वाचावं, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘मी प्रबोधनकार आणि यशवंतराव चव्हाण दोघांचीही पुस्तकं वाचली आहेत. पण मी बोलतो त्याचा आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे पवार साहेबांनी मला समजावून सांगावं. त्यांनी सोयीनं प्रबोधनकारांचं नाव घेऊ नये,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १३ जणांचा मृत्यू
- कोकण पुरामुळे बुडत असताना स्वतःला कोकणचा नेता म्हणवून घेणारे कुठे होते? – भाई जगताप
- ‘गोमूत्र शिंपडणारे समोर आले असते तेच गोमूत्र कोल्ड्रिंग सारखं घशात घालून पुढे निघालो असतो’
- संभाजीराजेंनी केलं प्रकाश आंबेडकरांच कौतुक; तर अशोक चव्हाणांवर हल्लाबोल
- अशोक चव्हाणजी, आम्हीही ९६ टक्केवाले मराठे आहोत!’, संभाजीराजेंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

