मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कविता कौशिक आपल्या परखड मतांमुळे सध्या चांगलीच ओळखली जात आहे. कविता सोशल मिडियावर देखील चांगलीच सक्रीय असते. अनेकदा ती सोशल मिडीयावर तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करते. मात्र यावेळी तिने शेअर केलेल्या फोटोवरून तिला ट्रोल करण्यात आले. यावर कविताने ट्रोल करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.
https://www.instagram.com/p/CRGEHDeLrpr/?utm_source=ig_web_copy_link
कविताने शेअर केलेल्या फोटोत ती काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये असल्याचे दिसत आहे. यावर तिने ‘आकाशात कोणीतरी आहे जो मला उडण्यासाठी पंख देतोय’ अशा आशयाची कॅप्शन तिनं या फोटोवर केली होते. मात्र हे पाहून काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. ‘बूढ़ी घोड़ी लाल लगाम’ अशा प्रतिक्रिया देत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावर कविताने उत्तर देत ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.
Bhaiya maine toh koi laal lagaam nahi lagaai, make up bhi nahi kiya, thoda lipbalm hai bass, aur budha toh aapka baap bhi hoga, MA bhi hogi toh kya kare ? Iss desh mei umar badhna paap hai kya ? Ye taaleem doge iss dp ki bacchi ko ki 'beta 40 ke baad tera jeena bekar hai' ? ???????? https://t.co/aivTeLP4vo
— Kavita Kaushik (@Iamkavitak) July 9, 2021
यावर कविता म्हणाली की, ‘भावा, मी कुठल्याही प्रकारचा लाल लगाम लावलेला नाही. अरे मी तर मेकअप पण केला नाही. केवळ थोडासा लिप बाम लावला आहे. म्हातारे तर तुझे आई-वडिलही असतील. या देशात वय वाढणं पाप आहे का? आपल्या मुलांना तू हेच संस्कार देणार का? तसं झालं तर चाळीशी नंतर तुझं आयुष्य जगणं हे व्यर्थ आहे.’ असे परखड उत्तर देत तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘हा स्प्रे मी आमिरला द्याला हवा होता, त्यामुळे त्याचा घटस्फोट झाला नसता’; राखीचे अजब विधान
- रावसाहेब दानवे मोदींप्रमाणे १८ तास काम करणार! रेल्वे मंत्रालयाचे कामकाज चालणार दोन शिफ्टमध्ये
- निवडणुका रद्द…हे तर भाजपच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे यश, भाजप आमदाराचा दावा
- १९ वर्षानंतर ह्रतिक आणि सैफ पुन्हा एकत्र! दाक्षिणात्य ‘विक्रम वेधा’च्या रिमेकमध्ये झळकणार
- काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; नितीन राऊतांची पटोलेंविरुद्ध सोनियांकडे तक्रार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

