🕒 1 min read
पुणे : राज्य सरकारने नुकताच प्रभाग पद्धती बाबतचा निर्णय जाहीर केला आहे. मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये त्रिसदस्यीय प्रभाग पद्धत असणार आहे. तर, मुंबईत केवळ एक सदस्याचा वॉर्ड असेल, असे राज्य सरकारने जाहीर केलं आहे. यामुळे पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.
आघाडी-युतीची समीकरणे बदलल्यानंतर महत्वाच्या महापालिकांची होणारी ही पाहिलीच निवडणूक असल्याने जनता काय कौल देणार हे महत्वाचं ठरणार आहे. तर, महाविकास आघाडीतील तीनही पक्ष युती आणि स्वबळ याबाबत वेगवेगळी भूमिका घेत असल्याचं समोर येत आहे. दरम्यान, महाविकास आघाडी स्थापन करण्यात महत्वाचा वाटा असणारे आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला अधिक सक्रिय करण्यासाठी कार्यकर्त्यांचे मेळावे व बैठका घेत आहेत.
आता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या दोन महापालिका म्हणजेच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका याकडे आपला मोर्चा वळवला आहे. ‘पिंपरी चिंचवड आणि पुण्यात शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे,’ अशी गर्जना संजय राऊत यांनी केली आहे.
यासोबतच, महाविकास आघाडी आहे. सगळ्यांना थोडं मिळालं पाहिजे. या न्यायाने पुणे आणि पिंपरीत सेनेचा महापौर झाला पाहिजे, अशी आमची इच्छा असेल तर चुकलं कुठे ? असा सबळ देखील राऊत यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, महापालिकेचे कुणाचे कितीही आकडे आले तरी महापौर आपलाच होईल… मी असं म्हणत नाही की आम्ही शंभर जागा जिंकू… पण मी मागे म्हटल्याप्रमाणे 55 जागा आल्या तरी आमचा मुख्यमंत्री होतो तर चाळीस-पंचेचाळीसला किमान पिंपरी-चिंचवडचा महापौर झाला पाहिजे, आमची अत्यंत माफक अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या मस्ती चढलेल्या आमदारावर गुन्हा दाखल करा, नाहीतर…; मनसेचा आक्रमक इशारा
- आमदारकीचा माज घरी दाखवा सुनिल कांबळे; महिला अधिकारी शिवीगाळ प्रकरणी चाकणकर आक्रमक
- इमरान हाश्मी साकारणार आणखीन एका हॉरर चित्रपटात मुख्य भूमिका
- ‘…तर सोनिया गांधी पंतप्रधान का होऊ शकत नाहीत?; आठवलेंचा सवाल
- हिम्मत असेल तर आता माझा कोल्हापूर दौरा अडवून दाखवा-सोमय्यांचे आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
