🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. सेना-भाजपच्या नेत्यांमध्ये टीकांचे धारदार बाण एकमेकांवर सोडले जात आहेत.
नारायण राणेंना पोलिसांनी अटक देखील केली होती. तर राणेंची अटक ही पोलिसांवर दबाव टाकून करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध भाजपा असं चित्र पाहायला मिळतं आहे. दरम्यान राणे यांना अटक झाल्यानंतर प्रमोद जठार हे नाव प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्याचे कारण होते अटकेनंतर जठार यांनी केलेले काही वक्तव्य.
‘छत्रपती संभाजी महाराजांनासुद्धा याच संगमेश्वरमधून अटक झाली होती. यानंतर औरंजेबाच्या सरकार संपलं होतं. संभाजीराजेंसोबत इथे दगाफटका झाल्यानंतर औरंगजेबाचं थडगं महाराष्ट्रात केलं होतं. त्यामुळे या सरकारनं लक्षात ठेवावं त्यांचं थडगं महाराष्ट्रात उभं केल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही. ठाकरे सरकारने हा दगाफटका केला असून खंडणीखोर बाहेर फिरत आहेत. गंभीर आरोप असलेले नेते, मंत्री बाहेर फिरत आहेत आणि या मराठ्याला सरकारने अटक केली आहे,’ असे वक्तव्य त्यांनी केले आणि काही काळामध्येच ते वादाच्या भोवर्यात अडकले.
दरम्यान आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनीही ट्विट करुन जठार यांच्यावर निशाणा साधला. तसेच, राणे कुटुंबीयांवरही प्रहार केला आहे. ‘छत्रपती संभाजी महाराजांची संगमेश्वरातील अटक ‘दिल्लीश्वराच्या’ सांगण्यावरून मोगलांनी केली होती. मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत दिल्लीश्वरापुढे न झुकणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची तुलना दिल्लीची हुजरेगिरी करणार्याशी कुणी केली तर मावळ्यांचा ‘जठरा’ग्नी प्रज्वलीत होईल, हे विसरू नका,’ अशा शब्दात मिटकरी यांनी घणाघात केला आहे.
छ.संभाजी महाराजांची संगमेश्वरातील अटक "दिल्लीश्वराच्या" सांगण्यावरून मोगलांनी केली होती. मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत दिल्लीश्वरापुढे न झुकणाऱ्या छ. संभाजी महाराजांची तुलना दिल्लीची हुजरेगिरी करणार्याशी कुणी केली तर मावळ्यांचा 'जठरा'ग्नी प्रज्वलीत होईल हे विसरू नका.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 27, 2021
तर कालच जठार यांचे हे कृत्य अत्यंत निंदनीय व छत्रपती संभाजी महाराजांचा अवमान करणारे असल्याची तक्रार शिवसेना आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक यांनी पोलीस ठाण्यात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शनिवार-रविवारी अजिंठा लेणी बंद असल्याने अमेरिकेचे शिष्टमंडळ खोळंबले!
- ‘औरंगाबादच्या दीक्षा शिंदेंची नासात निवड ही अफवा!’, खा.जलील यांचे ट्विट
- ‘भारताने अद्यापही तालिबानवर बंदी का घातली नाही?’, ओवेसींचा मोदींना सवाल
- महाविकास आघाडीचा निर्णय! आशा स्वयंसेविकांना हजार रुपये, गटप्रवर्तकांना १२०० रुपये वाढ
- महाविकास आघाडीतील तीन पक्ष आता शेवटची तडफड करतायत – चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
