Share

शनिवार-रविवारी अजिंठा लेणी बंद असल्याने अमेरिकेचे शिष्टमंडळ खोळंबले!

Published On: 

औरंगाबाद : अमेरिकेच्या शिष्टमंडळाला जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळ लेणी पाहण्याची इच्छा असली तरी राज्य सरकारच्या आदेशानुसार शनिवार आणि रविवार या लेणी पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे अमेरिकेचे शिष्टमंडळ खोळंबले आहे. या संदर्भात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी लेणी शनिवार आणि रविवारी खुल्या करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

औरंगाबाद शहरापासून जवळच असलेल्या अजिंठा आणि वेरुळ इथल्या लेणी पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. या पर्यटनावर शहर आणि जिल्ह्यातील अनेकांचा रोजगार अवलंबून आहे. मात्र, गेल्या दिड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे हा व्यवसायिक त्रस्त आहे. आताही या लेणी खुल्या करण्यात आल्या असल्या तरी शनिवार आणि रविवार त्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमुड होत आहे. अनेकदा कामानिमित्त शनिवार किंवा रविवार असाच वेळ मिळतो. त्यात आठवड्याच्या अखेरीस लेणी बंद राहत असल्याने पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.

या संदर्भात औरंगाबादमधील प्रसिद्ध पर्यटन व्यावसायिक आणि पर्यटनावर आधारीत व्यावसायिकांची संघटना असलेल्या ‘एटीडीएफ’चे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी शनिवार आणि रविवार लेणी खुली ठेवण्याची मागणी केली आहे. अजिंठा पर्यंत जाणाऱ्या रस्त्यांच्या कामाबाबतही लक्ष घालण्याची आवश्यकता त्यांनी या पत्रात नमूद केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!