औरंगाबाद : महिना झाला तालुक्यात पावसाचा थेंब पडला नाही. शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्या पिकांसाठी जायकवाडी जलाशयाच्या कालव्यातुन सिंचनासाठी पाणी सोडा नसता आंदोलनाचा ईशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.
तालुक्यात अद्याप योग्य असा पाऊस पडला नाही व त्यामुळे बहुतांश शेतक-यांचे पेरणी होऊ शकली नाही ज्या ठिकाणी पेरणी झाली त्या ठिकाणचा सर्व पिक हे सुकून चालले आहेत. शेतक-यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने त्वरित लक्ष घालावे.
तसेच दोन्ही कालव्यामध्ये पाणी सोडावे जेणेकरून शेतक-यांना दिलासा मिळेल. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनचा ईशारा तालुका अध्यक्ष डॉ.सुनील शिंदे, महेश जोशी, भाऊसाहेब बोरुडे, विजय चाटुपळे, विजय ठाणगे, श्याम पंजवानी, सोमनाथ शिंदे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! प्रणव मुखर्जींचे पुत्र ‘तृणमूल’मध्ये
- मोहन भागवतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ओवेसी म्हणाले, ‘ही तर हिंदुत्त्वाचीच देण’
- ‘हिंदू-मुस्लिम वेगवेगळे नाहीत, सर्वांचा डीएनए एकच’, मोहन भागवत यांचे वक्तव्य
- ‘मराठा समाजाच्या प्रश्नांवर वादविवाद नकाे’, संभाजीराजेंचे आवाहन
- ‘इम्पेरिकल डेटा केवळ राज्य सरकार गोळा करू शकते, ठराव फक्त दिशाभूल करण्यासाठी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

