बीड: भाजपचे दिवंगत नेते तसेच लोकनेते म्हणून ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त डाक पाकीटचं अनावरण करण्यात आलं. या निमित्ताने गोपीनाथ गडावरुन ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते या कार्यक्रमात सहभागी झाले. या वेळी पंकजा मुंडे यांनी देखील आपल्या भावना मांडल्या. आज गोपीनाथ मुंडे साहेब असते तर मराठा समाजाला आरक्षणासाठी दारोदारी फिरायची वेळ आली नसती, असे मत यावेळी त्यांनी मांडले.
महाविकास आघाडी सरकारमुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झालं, तसेच मराठा समाजाचं आज लोकनेते, जननायक गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला. मुंडे साहेबांनी तळागाळातल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं होतं, मात्र आज कुठे गेला हा समाज, असा प्रश्न मुंडेंनी यावेळी उपस्थित केला.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वांनी आपापल्या पोळ्या भाजायचे काम केले आहेत, निवडणुका जवळ आल्या की समाजाचं पुळका येतो, अशा शब्दांमध्ये पंकजा मुंडेंनी आपली मते मांडली. मात्र आता असं होता कामा नये, नुसते आश्वासनं आणि भाषणं देऊ नका, मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देणार हे स्पष्ट सांगा, जे काही असेल आम्हाला मान्य आहे मात्र जे आहे टे समाजाच्या डोळ्यात डोळे घालून जे सत्य आहे ते बोला, अशा सूचना देखील मुंडे यांनी यावेळी भाषणादरम्यान दिल्या. आता स्वतः गावा-गावात जाऊन या समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणार असल्याचे देखील यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘सरकारने शरियत कायद्यामध्ये हस्तक्षेप केल्याने करोना आणि चक्रीवादळांसारख्या आपत्ती आल्या’
- राज्याच्या जीएसटी वसुलीत मोठी घट, लॉकडाऊनच्या निर्बंधांचा अर्थव्यवस्थेला फटका
- दीपिका सिंह नव्या डान्स व्हिडीओमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर झाली ट्रोल…
- अंकिता लोखंडेचा चाहत्यांना ‘गुड बाय’ ; पोस्ट शेअर करत दिली माहिती
- ‘लसीकरणाबाबत केंद्राची पॉलिसी स्पष्ट नाही; रोज नवीन नियमांची होतेय घोषणा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

