औरंगाबाद : मराठवाड्यावर नेहमीच अन्याय होत आलाय. अनेकदा मागण्या करूनही रेल्वे प्रश्न प्रलंबित आहेत. औरंगाबादहुन पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. आयटी क्षेत्र असल्याने विद्यार्थी, तरुण वर्ग औरंगाबादहुन पुणे येथे रोज जातात आणि येतात. त्यामुळे औरंगाबाद-नगर आणि पुणे मार्गे जाण्यासाठी थेट रेल्वे आवश्यक आहे. लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागेल. येणाऱ्या अधिवेशनात याविषयी आपण विचारणा करणार असल्याचे खा. इम्तियाज जलील यांनी दिली. रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रश्नाबाबत बोलतांना आपले मत मांडले.
औरंगाबाद-नगर आणि पुणे या ठिकाणी औरंगाबादहुन जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र औरंगाबाद-नगर आणि पुणे या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेने जाण्यासाठी बरेच फिरून जावे लागते. त्यामुळे औरंगाबाद-नगर आणि पुणे कनेक्टिव्हिटी वाढणार केव्हा? असा प्रश्न आता उपस्थित केला जात असून प्रवाशांचे देखील याकडे लक्ष लागले आहे.
रेल्वे प्रश्नाबाबत नेहमीच आक्रमक असलेले खा. इम्तियाज जजलील याबाबत म्हणाले, औरंगाबाद-नगर आणि पुणे मार्गे जाण्यासाठी थेट रेल्वे आवश्यक आहे. त्यासाठी औरंगाबाद-नगर- पुणे रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविणे आवश्यक आहे. सर्वेक्षण होते तर सकारात्मक बदल होतोय असे वाटले होते. मात्र अजूनही कनेक्टिव्हिटी प्रश्न प्रलंबित असल्याचेच दिसत आहे. याशिवाय दुहेरी मार्गाचेही काम बाकी आहे. याबाबत नेहमीच परवडत नाही असे सांगितले जात असेल तर यावर आंदोलनाचा पावित्रा घ्यावा लागेल. यावर येणाऱ्या अधिवेशनात विचारणा करणार असल्याचे खा. इम्तियाज जलील यांनी सांगितले.
लवकरात लवकर मार्ग व्हावा
औरंगाबाद – पुणे -नगर कनेक्टिव्हिटी वाढली तर त्याचा फायदा उद्योजक, विद्यार्थी वर्ग आणि इतर प्रवाशांना होईल. औरंगाबाद-नगर मार्गाचे सर्वेक्षण देखील झाले आहे मात्र अहवाल बाकी आहे. औरंगाबाद-नगर मार्ग लवकर झाला तर पुणे मार्ग देखील होईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वेक्षण झालेला अहवाल सादर करून काम सुरू करावे. त्यामुळे प्रवाशांना फायदा होईल असे मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अनंत बोरकर यांच्या वतीने स्पष्ट सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- भारतीय स्वातंत्र्याच्या १८५७ च्या उठावात ‘औरंगाबाद’चे मोलाचे योगदान : डॉ. रमजान शेख
- मनपाचा स्तुत्य पुढाकार! गरीब विद्यार्थीही घेऊ शकतील सीबीएसएसी, इंग्रजी माध्यमातून शिक्षण
- नवी मुंबई विमानतळाच्या नावाचा वाद चिघळला; दि. बा. पाटलांच नाव दिलं नाही तर १५ ऑगस्टनंतर…
- औरंगाबाद मनपा निवडणूकीच्या दृष्टीने करण्यात आलेली भाजप धार्जिनी वॉर्ड रचना रद्द करा
- इतर विभागांतील ‘वाझें’चा पत्ता फडणवीसांना कुणी दिला?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

