औरंगाबाद : भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या लढयाची सुरुवात २३ जून १८५७ रोजी औरंगाबादच्या खाम नदीवरील लोखंडी पुलाजवळ झाली. इंग्रजांनी या लढ्यातील हिंदी सैनिकांना, क्रांतीकारकांना तोफेच्या तोंडी देऊन शहीद केले होते. त्यामुळे या लोखंडी पुलाला स्वतंत्र लढयाचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. दरवर्षी छावणीने स्वातंत्र्य लढ्याचा दिन साजरा करावा. ज्या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे आज आपण मुक्तपणे स्वतंत्र्यात जगत आहोत याची आठवण येणाऱ्या पिढीला करून देऊन त्यांच्यात देशप्रेम जागृत करावे, असे प्रतिपादन डॉ. शेख रमजान यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या खाम नदीच्या छावणी लोखंडी पुलाजवळ बुधवारी (दि.२३) ‘आझादी चा अमृत महोत्सव’ यानिमित्ताने डॉ. रमजान शेख यांचे १८५७ चा लढा या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. डॉ. रमजान शेख म्हणाले की, २३ जून १८५७ हा दिवस अत्यंत महत्त्वाचा होता. अबुल याने अहमदनगर येथून भरपूर सैन्य बोलावून ते दहा वाजता दाखल झाले. इंग्रजांनी भारतीय सैन्यावर आक्रमण करून क्रांती दडपून टाकली.
लढ्यातील हिंदी सैन्यांवर, क्रांतिकारकांवर गोळ्या झाडून तर काही क्रांतिकारकांना तोफेच्या तोंडी देऊन तर काहींना फासावर देऊन शाहिद केले. स्वातंत्र्य लढ्यासाठी २१ क्रांतिकारकांना शहीद व्हावे लागले. स्वातंत्र्य लढ्याचा हा रक्तरंजित इतिहास तरुण पिढीला माहित व्हावा, यासाठी छावणी परिषदेने दरवर्षी अशा कार्यक्रमाचे आयोजन केले पाहिजे, असे डॉ. रमजान शेख म्हणाले.
महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, क्रांतिकारकांच्या बलिदानाने पवित्र झालेल्या खाम नदीच्या पुनर्जीवनाचे काम आपण हाती घेतले असून नदीचा कायापालट होत आहे. महानगरपालिका, स्मार्ट सिटी, छावणी परिषद, व्हॅरोक, ईको सत्व मिळून काम करत आहे. खाम नदीने स्वातंत्र्य संग्राम पाहिला. त्या मातेला पूर्व वैभव मिळवून देणे हे आमचे दायित्व आहे.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची पहिली सुरुवात २३ जून १८५७ मध्ये औरंगाबादच्या खाम नदीच्या लोखंडी पुलाजवळ झाली. याबद्ल इतिहासाचा मागोवा घेतला. खाम नदीच्या स्वच्छतेचे काम महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या टीमने हाती घेतले असून खाम नदीचा विकास होताना दिसत आहे. या नदीच्या विकासाच्या कामासाठी त्यांनी चांगल्या व्यक्तींची निवड केली आहे. असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- मनातून काँग्रेस जात नाही, भाजपातील अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक – नाना पटोले
- जिओचा आता सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन ‘या’ तारखेला येणार बाजारात !
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा दिक्षांत समारंभ शुक्रवारी
- औरंगाबादेत सकाळी ७ वाजेपासून लसीकरण केंद्रांवर लांबच लांब रांगा, तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
- ‘अरे तुमच्यात हिंमत नसेल तर सांगा, मी चार महिन्यात ओबीसींना आरक्षण देतो’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
