Share

मनपाचा स्तुत्य पुढाकार! गरीब विद्यार्थीही घेऊ शकतील सीबीएसएसी, इंग्रजी माध्यमातून शिक्षण

Published On: 

औरंगाबाद : महापालिका हद्दीतील गरजू, गरीब मुलांना दर्जेदार तसेच इंग्रजी माध्यमातूनही शिक्षण घेता यावे यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. हलाखीच्या परिस्थितीत इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे अवाजवी शुल्क भरणे त्यांच्यासाठी अवघड आहे. अशा पालकांची अडचण लक्षात घेत महापालिकेच्या शिक्षक विभागाने सीबीएसएसी माध्यमांच्या दोन शाळांसह आठ इंग्रजी शाळा सुरु करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मोफत मिळेल, अशी माहिती पालिका शिक्षण अधिकारी रामनाथ थोरे यांनी दिली.

सद्यस्थितीत शहरात पालिकेच्या एकूण ७२ शाळा आहेत त्यात सुमारे १२ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यातील ४८ शाळा या मराठी, सहा व्दिभाषीक आणि १८ उर्दु माध्यमांच्या आहेत. यातील ११ केंद्रीय शाळा तर १७ शाळा या माध्यमिक आहेत. यासाठी ४१२ शिक्षकांची नेमणुक केली आहे. १४१ बालताई या सध्या कार्यरत आहेत. ५१ शिक्षक माध्यमिक विभागासाठी काम करतात. त्यातच आता पालिकेने सीबीएससी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

यासाठी लागणारी जागा, विद्यार्थी संख्या, पायाभूत सुविधा या सर्वांचा विचार प्रियदर्शनी विद्यालय आणि उस्मानपूरा येथील पालिका शाळांची जागा निश्‍चित केली आहे. सोबतच आठ नवीन इंग्रजी माध्यमांच्या शाळा देखील सुरू केल्या जाणार आहेत. पहिल्या टप्यात पहिली ते पाचवीच्या इयत्तांसाठी हे वर्ग सुरु करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर पुढील वर्गाची संख्या वाढवण्यात येईल, असे शिक्षणाधिकार्‍यांनी सांगितले. यातील काही शाळा विनाअनुदानीत असतील. तरी देखील विद्यार्थ्यांना मोफतच शिक्षण मिळेल, या शाळांसाठी वेगळ्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. साधारणपणे जुलै महिन्यात हे वर्ग सुरु होतील, या दिशेने पालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!