Share

इतर विभागांतील ‘वाझें’चा पत्ता फडणवीसांना कुणी दिला?

Published On: 

 मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी वसुलीच्या आरोपांवरून राज्यात गदारोळ निर्माण झाला होता. त्यानंतर सचिन वाझेला अटक करण्यात आली. देशमुखांनाही पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता अन्य विभागातील ‘सचिन वाझें’कडं फडणवीसांनी मोर्चा वळवला आहे. या वाझेंचे पत्ते आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत फडणवीस यांना हा दावा केला आहे. यावेळी फडणवीस यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, आजची महाराष्ट्राची स्थिती पाहून त्याला सरकार म्हणता येईल का? मंत्री झाले एकेक विभागाचे राजे अन् प्रत्येक विभागात एकेक वाझे, अशी अवस्था झाली आहे. पोलिस विभागातील एक वाझे पुढे आला. पण इतर विभागांतील वाझेंचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे. तो आम्हाला सांगता येऊ नये म्हणून अधिवेशन दोनच दिवसांचे केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

दरम्यान,फडणवीस यांनी केलेल्या या दाव्यानंतर इतर विभागांतील वाझेंचा पत्ता हा फडणवीस यांना नेमका कोणी दिला हा मुख्य सवाल आहे. कारण  काही अधिकारी हे फडणवीस यांना मदत करत असल्याची कुजबुज सुरु असते मग महाविकास आघाडी सरकारचे या अधिकाऱ्यांवर नियंत्रण नाही का असा देखील सवाल उपस्थित होत आहे. याशिवाय जर काही नेतेच याबाबत माहिती देत असतील तर ते अस्तीनीतील निखारे कोण आहेत हे सुद्धा शोधून काढणे सरकारसाठी आवश्यक आहे.

दरम्यान, फडणवीस यांचे इतर विभागांतील ‘वाझें’च्या बाबतचे हे वक्तव्य नुसती राजकीय धूळफेक असू शकेल का याबाबत मतमतांतरे असू शकतात मात्र  फडणवीस हे पुराव्याशिवाय काहीही बोलणार नाहीत हे देखील तेवढेच खरे आहे. यातच आज सचिन वाझे यांच्या पत्राच्या आधारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला आहे.यामुळे फडणवीस यांच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले आहेत का याबाबत देखील उलटसुलट चर्चा आहे.

कार्यकारिणीत मंजूर करण्यात आलेल्या राजकीय ठरावात म्हटले आहे की, जनतेला जेरीस आणलेल्या या सरकारने गुन्हेगारांना मात्र सुरक्षा कवच पुरवले आहे.  वाजे प्रकरण, गृहमंत्र्याचे खंडणी वसूली प्रकरण, पोलिस खात्यातील बदली भ्रष्टाचार अशा अनेक  ;प्रकरणामुळे ठाकरे सरकारची विश्वासार्हता संपुष्टात आली आहे.सचिन वाजे यांच्या पत्रातील उल्लेखाच्या आधारे अनिल देशमुख यांच्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी.

बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याच्या ऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहे. गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपांप्रमाणेच अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर बडतर्फ सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंह यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी ही कार्यकारिणी करत आहे.दरम्यान, परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे आता यामध्ये अजित पवार  आणि अनिल परब यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!