औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने २०२० मध्ये काढण्यात आलेली भाजप धार्जिनी वॉर्ड रचना रद्द करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या माजी नगरसेविका रेश्मा कुरैशी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यात भाजपने स्वतःच्या पक्षासाठी फायदेशीर ठरेल अशी वॉर्डरचना केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
गेल्या दिड वर्षांपासून औरंगाबाद मनपा निवडणूकीबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. निवडणूका आज होतील उद्या होतील या आशेपायी इच्छुकांनी तयारी सुरु केली होती. मात्र शपथपत्र दाखल न झाल्यामुळे मनपा निवडणूकीवर अद्यापपर्यंत सुनावणी झालेली नाही. त्यावेळी महापालिकेची एप्रिल २०२० मध्ये होणारी निवडणूक लक्षात घेऊन म्हणजेच राज्यात भाजप सरकार असताना भाजपला पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी फायदेशीर होईल, अशीच वॉर्ड रचना तयार करण्यात आली आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
वॉर्ड रचनेची सोडत काढून १८ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. या वॉर्ड रचनेवर आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. या निवेदनात म्हटले आहे, माझ्या वॉर्ड क्रमांक ६९ मधून १३०० मुस्लिम मतदान वगळून इतर वॉर्डात टाकण्यात आले आहेत तर इतर वॉर्डातील मतदारांचा समावेश माझ्या वॉर्डात करण्यात आला आहे. भाजपचे खासदार डॉ. भागवत कराड यांच्या पत्नीचा पराभव करुन मी गेल्यावेळी निवडून आले होते, असेही रेश्मा कुरैशी यांनी निवेदनात नमूद केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिओचा आता सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन ‘या’ तारखेला येणार बाजारात !
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा दिक्षांत समारंभ शुक्रवारी
- औरंगाबादेत सकाळी ७ वाजेपासून लसीकरण केंद्रांवर लांबच लांब रांगा, तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
- ‘अरे तुमच्यात हिंमत नसेल तर सांगा, मी चार महिन्यात ओबीसींना आरक्षण देतो’
- डब्ल्युटीसी फायनल! पराभवानंतरी न्युझीलंडसह बीसीसीआयही झाली मालामाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
