रत्नागिरी: गेल्या सहा सात महिन्यापासून रिफायनरीवर चर्चा होत असताना पाहायला मिळत आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावर मोठं विधान केलं आहे. म्हणाले, “कुठेही प्रदूषण वाढणार नाही, पर्यावरणाला काही हानी होणार नाही याची दक्षता घेऊनच आपण पुढे जाऊ. प्लानिंग करून पुढे जाऊ”.
पुढे म्हणाले, रिफायनरी प्रकल्पासाठी जागा शोधायचा प्रयत्न सुरू आहे. वाड्या वस्त्या नसतील, गावं नसतील अशा जागा शोधत आहोत. कुठेही प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊनच तो प्रकल्प आला तर आम्ही त्याला पुढे मान्यता देऊ, असं विधान आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प मार्गी लागण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मीडियाशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
कुठेही चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर स्थानिक लोकांबरोबर चर्चा करून त्यांचे न्याय हक्क कसे अबाधित राहतील, त्यांचं नुकसान होणार नाही आणि त्यांचा विश्वास संपादन करून आम्हाला पुढे जायचं आहे. नाणारचे दोन्ही बाजूचे शिष्टमंडळ मला भेटणार आहे. त्यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –
क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर विल स्मिथची पोस्ट चर्चेत; म्हणाला…
“भाजपची काळी जादू चालणार नाही, सरकार…” – नाना पटोले
“विजेची बिलं अशाच मनमानी…”, भातखळकरांचा नितीन राऊतांना जोरदार टोला
LSG vs GT: लखनौच्या ‘या’ खेळाडूची दमदार खेळी बघून कर्णधार राहुल म्हणाला, हा तर ‘बेबी एबी’!
“वारे रे पाकिटमार मोदी सरकार”, महागाईवरून नाना पटोलेंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

