🕒 1 min read
मुंबई- अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणामुळे तसेच ड्रग्ज प्रकरणामुळे बॉलीवूडमध्ये शीतयुद्ध सुरु आहे. यातच आता अभिनेता रणवीर शौरीने नुकतेच ‘ड्रग्ज’ बाबत भाष्य केले आहे. बॉलिवूडमधील ड्रग सेवनाबद्दल त्याने त्याची मतं मांडली आहेत. दरम्यान यावेळी रणवीर शौरीने गांजा भारतात लीगल करण्याबाबत भाष्य केले आहे.
‘हाय’ वेब सीरीज प्रदर्शित झाल्यानंतर रणवीर शौरीने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान त्याला सध्या सुरू असलेल्या ड्रग्ज प्रकरणासंदर्भात प्रश्न विचारला गेला. त्यावर बोलताना रणवीर म्हणाला, ‘बॉलिवूडमध्ये जितकी ड्रग्जची देवाण-घेवाण होते, तितकीच ती समाजात होते, असे मला वाटते. मी कितीतरी नॉन-बॉलिवूड पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा सर्रास वापर पाहिला आहे.’
पुढे तो म्हणाला की, ‘ज्या लोकांना भारतात गांजा विक्री कायदेशीर व्हावी वाटते, अशा लोकांपैकी मी एक आहे. अनेक देशात गांजाला कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे. भारतात मात्र, त्याच जुन्या कायद्यांची अंमलबजावणी सुरू आहे.’
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील ड्रग प्रकरण विशेष गाजते आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज’ बाबत मोठ्याप्रमाणावर चर्चा सुरु आहे. यातच अभिनेता रणवीर शौरीने केलेल्या या मागणीमुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- #Corona : कॉन्टक्ट ट्रेसिंगमध्ये लातूर पॅटर्न ठरतोय आदर्श
- निवडणूक आयोगानं शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ नाकारत ‘बिस्किट’ दिलं
- रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा – पडळकर
- वडिलांच्या चितेला अग्नी देताना चिराग पासवान यांना आली चक्कर
- सरकारी निधीतून चालवले जाणारे मदरसे नोव्हेंबरपासून बंद करण्याचा भाजपा सरकारचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
