Share

लॉकडाऊन झाल्यास गरिबांचेच नुकसान, त्यामुळे नियम पाळा-हिशाम उस्मानी

Published On: 

औरंगाबाद : शहरात सध्या कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने शहरात सोमवारपासून दहा दिवसांचे लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. परंतु, शहरात लॉकडाऊन लागणार का याविषयी प्रशासनाने अद्याप पर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र,शहर लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत आहे.

काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांना लॉकडाऊनबाबत विचारले असता त्यांनी सांगितले, सध्या शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसून येत आहेत. नागरिकांचा निष्काळजीपणाच यास कारणीभूत आहे. बाजारात गृहिणींची, हॉटेल-कॅफेजमध्ये तरुणांची झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. लग्न समारंभ ही जोरदारपणे सुरू आहेत. त्यामुळेच जर नागरिकांचा जीव वाचवायचा असेल आणि जर प्रशासनास लॉकडाऊनची नितांत गरज वाटत असेल तर लॉकडाऊन व्हावा हे आमचे मत आहे. प्रशासकांसोबत आमचे बोलणे सुरु आहे. अजून तरी लॉकडाऊनबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. लॉकडाऊन टाळता आला तर फार चांगले होईल कारण यात गरिब जनतेचेच जास्त मरण आहे.

महाराष्ट्र देशाच्या माध्यमातून मी सर्वसामान्य जनतेला आवाहन करू इच्छितो की, ज्याठिकाणी जास्त गरज आहे आवश्यकता आहे तेवढेच घराबाहेर पडा. कारण लॉकडाऊनमध्ये गरिब जनता, सामान्य व्यावसायिकच भरडले जाण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!