हिंगोली : काम होत नसेल तर आम्हाला आत्मदहन तरी करू द्या, अशा आशयाचे पत्र पाठवत सेनगाव येथील घरकुल लाभार्थ्यांनी मागणी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. गरजू व बेघर लोकांसाठी आपले हक्काचे घर व्हावे म्हणून घरकुल ही योजना शासनाने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत गरीब लोकांना त्यांच्या हक्काचे घर मिळते. पण यासाठी त्यांना गावातील सरपंच आणि ग्रामसेवकाची प्रस्तावावर स्वाक्षरी घ्यावी लागते.
या प्रस्तावावरील स्वाक्षरी करण्यास सेनगावातील सरपंच राजकीय हेतू पोटी नकार देत असल्याचे समोर आले आहे. या गोष्टीला कंटाळून लाभार्थ्यांनी थेट जि.प मुख्य कार्यकारी अधिकारीला पत्र लिहीत सरपंचाची तक्रार करत आत्मदहनाची परवानगी मागितली आहे. या मागणीला तरी पूर्ण करावं अशी विनंती लाभार्थ्यांनी जि.प अधिकाऱ्याकडे केली आहे.
हा प्रस्ताव सादर करण्याची १५ ही शेवटची तारीख असताना सुद्धा सरपंचाने या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नसल्यामुळे लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभापासून मुकावे लागणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी जि.प अधिकाऱ्याकडे तक्रार देत आपली कैफीयत मांडली सोबत दोषी सरपंचावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पदार्पणातच अर्धशतक झळकावत इशान किशनने जिंकले मन
- विराट फॉर्ममध्ये परतला ; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला तिसरा कर्णधार
- धोक्याची घंटा; मराठवाड्यात २ हजार ४६७, विदर्भात ४ हजार ९९३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
- भारताने केली पराभवाची परतफेड; इंग्लंडवर ७ गडी राखुन विजय
- पथदिव्याचे १० कोटी रुपये थकल्याने नांदेड शहर अंधारात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
