🕒 1 min read
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशच्या दौऱ्यावर आहेत. कोरोना काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. मोदींच्या या दौऱ्याचा कारण देखील खास आहे. बांग्लादेशच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आणि बंगबंधू शेख मुजबीर यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी त्यांना बोलावण्यात आलं आहे.
बांगलादेशची राजधानी ढाका येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या काही जुन्या आठवणी देखील सांगितल्या आहेत. ‘बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सत्याग्रह करणे हे माझ्या आयुष्यातील सुरुवातीच्या आंदोलनातील महत्त्वाचे आंदोलन होते,’ असे उद्गार यावेळी मोदींनी काढले आहेत.
यावरून आता भाजपा समर्थक आणि विरोधक अशी टीका टीप्पणी सुरु झालीय. यामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींववर निशाणा साधला आहे. तसेच शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही मोदींच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. जर संपूर्ण भारत बांगलादेशची निर्मिती व्हावी या बाजूने होता तर आंदोलनाची गरज काय होती?, असा प्रश्न चतुर्वेदी यांनी उपस्थित केलाय
India’s PM in 1971 despite criticism from countries like US, helped Bangladesh get its freedom from Pakistan.
Wonder what was the need for satyagrah when all Indians were on the same side&why would someone be arrested?
I am sure we will know soon, an interesting aspect to 1971.— Priyanka Chaturvedi???????? (@priyankac19) March 26, 2021
‘१९७१ मध्ये अमेरिकेसारख्या देशांकडून झालेल्या टीका असूनही भारताच्या पंतप्रधानांनी बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यात मदत केली. त्यामुळे सत्याग्रह करण्याची काय गरज होती जेव्हा सर्व भारतीय एकाच बाजूला होते आणि एखाद्याला अटक का केली जाईल? मला खात्री आहे की याबद्दल आम्हाला लवकरच कळेल,’ असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ कारणामुळे सामना आमच्या हातातून निसटला : विराट कोहली
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- …म्हणून पांड्याला बॉलिंग नाकारली कोहलीने सांगितले कारण
- ‘आणखी किती फेकाल मोदी जी, मराठीत एक लाईन आहे… हद झाली राव’
- अवैध दारू विक्री निदर्शनास आणून द्या, एक वर्ष करापासून मुक्ती मिळावा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
