मुंबई : आज १२ डिसेंबर माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. आज शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, देशाचं संरक्षणमंत्री पद, कृषीमंत्रीपद अशी अनेक महत्त्वाची पदं सांभाळली आहे.
सध्या शरद पवार हे राज्यसभा खासदार आहेत. महाराष्ट्रात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगामध्ये त्यांनी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार म्हणजेच शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी यांची मूठ बांधण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अनेक नेत्यांनी पवारांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पवारांचा वाढदिवस यंदा कोरोनाच भान राखून समाज उपयोगी कामांद्वारे साजरा केला जात आहे. राष्ट्रवादीतर्फे आज मुंबईत छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला राज्यातील राष्ट्रवादीचे नेते हे व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहिले होते, तर निवडक नेते हे प्रत्यक्ष स्थळी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या कार्यक्रमामध्ये पवारांना शुभेच्छा देताना त्यांच्या विषयी भाष्य केलं आहे. ‘शरद पवार आस्तित्वासाठी झगडणा-या बहुजनांच्या पेशींमध्ये आत्मसन्मानाचं बीज पेरत आले. तुकोबा, ज्ञानोबा, चोखोबा, नामदेव, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, राजर्षि शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण हा सर्वसमावेशक पुरोगामी विचारांचा तेजस्वी वारसा त्यांनी काळजात भरून घेतला आहे.’ असं कौतुक त्यांनी केलं.
यासोबतच, ‘शरद पवारांचे विचार पुन्हा नव्याने महाराष्ट्राच्या दगडमातीत रूजू लागले आहेत. कणखर विचारांचे भाले गवतांना पुन्हा दणक्यात फुटू लागले आहेत. त्यांचा आज वाढदिवस आपण साजरा करत आहोत. पण वाढदिवस माणसांना असतो युगाला नसतो ते असतं अजरामर, मूल्यविचारांसारखं चिरंजीव महाराष्ट्राचं हे युग – हे पर्व आज ८० वर्षांचं होत असलं, तरी महाराष्ट्राला वैचारिकदृष्ट्या ८०० वर्ष पुढे घेऊन गेलेलं हे महायुग आहे,’ अशी स्तुतिसुमनं त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून उधळली आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘ईडीला पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडलं हे हास्यास्पद!, अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार’
- शेतकरी आंदोलनाबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेला मारले जोडे
- पुण्यातील भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या राहत्या घरातून 18 लाखांच्या दागिन्यांची चोरी
- ‘कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटन विकास आणि त्यातून रोजगार निर्मितीला चालना देणार’
- ‘ठाकरे सरकार आल्या आल्या नाईट क्लबवाले त्यांच्या बापाचं सरकार असल्यासारखे वागू लागलेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

