🕒 1 min read
रत्नागिरी : सद्या लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी झाली असली तरी संकट मात्र कायम आहे. राज्यातील आकडेवारी मधल्या काही दिलासादायक आकड्यांपेक्षा वाढत आहे. त्यामुळेच खबरदारी घेणं गरजेचं असून राज्यातील यंत्रणेला तसे आदेश देखील देण्यात आले आहे. दरम्यान मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल मुंबईकरांना यांनी इशारा दिला आहे.
कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं आहे. परवा मुंबईतील दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी हजारो लोक हे मास्क न लावता क्लबमध्ये पाहण्यात आले होते. लोक असेच वागत राहिले तर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. याबाबत स्वतः आयुक्त्यांनी नाईट कर्फ्यू लावण्याची तंबीच अतिउत्साही मुंबईकरांना दिली आहे.
नागरिकांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर आम्हाला नाईलाजाने नाईट कर्फ्टू लागू करावा लागेल, असं म्हणत त्यांनी अल्टिमेटम दिला असून सुधारणा न दिसल्यास मुंबईमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात येणार आहे. क्लब, पार्ट्या, बार यांच्यामुळे कोरोना वाढू शकतो. त्यामुळेच नाईट लाईफची संकल्पना मांडणाऱ्या शिवसेनेसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर भाजपने हल्लाबोल केला आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी देखील ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. ‘सर्वात मोठा नाईट क्लब चालवणारा कलानगरात राहतो. मुंबईचे अर्ध्यापेक्षा जास्त नाईट क्लबवाले तिथे पडलेल्या असतात. प्रवीण परदेशी प्रिन्सिपल सेक्रेटरी असताना त्यांच्याकडून नाईट लाईफ प्लॅन आखून घेतला. ठाकरे सरकार आल्या आल्या नाईट क्लबवाले त्यांच्या बापाचं सरकार असल्यासारखे वागू लागलेत.’ अशी विखारी टीका त्यांनी केली आहे.
सर्वात मोठा नाईट क्लब चालवणारा कलानगरात राहतो. मुंबईचे अर्ध्यापेक्षा जास्त नाईट क्लबवाले तिथे पडलेल्या असतात. प्रवीण परदेशी प्रिन्सिपल सेक्रेटरी असताना त्यांच्याकडून नाईट लाईफ प्लॅन आखून घेतला. ठाकरे सरकार आल्या आल्या नाईट क्लबवाले त्यांच्या बापाचं सरकार असल्यासारखे वागू लागलेत. https://t.co/up5UDimyiN
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 11, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘तो’ काँग्रेस संपवण्याचा डाव, काँग्रेस नेत्याचा दावा; आता संजय राऊतांनी दिलं चोख प्रत्युत्तर
- शेतकऱ्यांनो, मी कृषी क्षेत्राच्या विकासाआड येणाऱ्या सर्व भिंती पाडतोय : मोदी
- शरद पवारांच्या यूपीए अध्यक्षपदासाठी महाराष्ट्राच्या दिग्गज काँग्रेस नेत्याचा पाठिंबा
- भाजप सर्वशक्तिमान आहे हे मान्य करायला हवं – संजय राऊत
- शेतकऱ्यांचा अवमान करणारे रावसाहेब दानवे हे येडपट आणि भैताड आहेत : वडेट्टीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
