मुंबई : गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. राज्य शासन आणि प्रशासनाने अथक प्रयत्न करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्यांना यशही आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
राज्यात दररोज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असून अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन व कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात रात्री आठ नंतर जमावबंदी लागू करण्यात आली असून मॉल्स, हॉटेल, चित्रपटगृहे व इतर दुकाने देखील रात्री आठच्या आधीच बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने लागू केले आहेत.
अशातच, पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याने सामान्यांसह उद्योजकांमध्ये काहीशी भीती निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वात अंधेरीमधील ओशिवरा भागात दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांनी आंदोलन केलं आहे. यावेळी निरुपम म्हणाले, ‘मागील लॉकडाऊनमध्ये सामान्य जनता, विविध व्यावसायिक यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. आता पुन्हा दुसऱ्या लाटेच्या नावाने लॉकडाऊनचा कार्यक्रम आणला जात आहे. तो चुकीचा आहे. हे सर्व निर्बंध देखील चुकीचे आहेत. लोकांच्या विरोधातील आहे.’ असं भाष्य त्यांनी केलं आहे.
यासोबतच, त्यांनी काँग्रेस मंत्र्यांना देखील घरचा आहेर दिला आहे. ‘काँग्रेसमध्ये जे मंत्री आहेत, त्यांनी लोकांमध्ये सलोखा निर्माण केला पाहिजे. या मंत्र्यांनाच जर जनतेच्या भावना समजत नसतील तर ते चूक करत आहेत,’ अशी टिप्पणी संजय निरुपम यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पालकमंत्र्यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
- ‘नजरचुकीने झालेली चूक १२ तासात सुधारली पण ‘ती’ घोडचूक कधी सुधारणार ?’
- दोन हजाराची लाच मागणारा लाचखोर अभियंता एसीबीच्या जाळ्यात!
- …म्हणून प्राजक्ता नंतर आता वीणा जगतापने सोडली ‘आई माझी काळुबाई’ मालिका
- कोरोना उपचार केंद्रांची संरचनात्मक व अग्निप्रतिबंधात्मक तपासणी; खाटांची संख्या वाढणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
