ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असून जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बुधवारी तातडीची बैठक घेऊन त्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाची दुसरी लाट आल्याने शहरात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ही रुग्णंसख्या आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिकेने सज्ज राहावे, अशा सूचना पालकमंत्री शिंदे यांनी बैठकीत केल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातील खाटा वाढविणे, संशयित रुग्णांचा शोध घेणे, गृह विलगीकरणातील व्यक्तींच्या हातावर शिक्का मारणे आणि मुंबईच्या धर्तीवर मार्शलमार्फत विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत केल्या आहेत.
तसेच ज्या विभागात रुग्ण सापडत आहेत, तेथील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी फलक लावावेत. कोरोनाबाधित रुग्णांना मदत व्हावी यासाठी शहरातील फलकावर कोविड वॉररूमचे दूरध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्याचे आवाहन करावे, असे पण यावेळी त्यांनी सांगितले आहे.
तसेच कोरोनाची लागण झालेल्या गरोदर महिलांसाठी विशेष व्यवस्था, सहव्याधी रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्याचबरोबर ग्लोबल कोविड रुग्णालय आणि पार्किंग प्लाझा रुग्णालय या दोन्ही ठिकाणी सीटीस्कॅन सुविधा सुरू करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत.
यावेळी शिंदे म्हणाले कि, गृह विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींचा नियमित आढावा घेऊन त्यांच्या हातावर शिक्के मारावेत. हे रुग्ण घराबाहेर पडणार नाही, याची काळजी घ्यावी आणि त्यांच्याशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टराचे पथक सज्ज ठेवावे. तसेच या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आणि संशयित रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल करण्यावर भर द्यावा. अश्या सूचना पण त्यांनी यावेळी केल्या.
मागील वर्षीपेक्षा यावेळेस कोरोना संक्रमणाचे प्रमाण हे जलदगतीने होत असून यामुळे रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी या सर्वानी मिळून सक्षमपणे काम करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी त्यांनी रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर बंद करण्यात आलेले विलगीकरण कक्ष पुन्हा सुरू करून त्याठिकाणी दैनंदिन साफसफाई, आवश्यक औषध पुरवठा, तज्ज्ञ डॉक्टर, भोजन अशी चांगली व्यवस्था करावी. अशा सूचनाही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : ‘या’ तालुक्यात आजपासून १० दिवस कडक जनता कर्फ्यु…
- ‘सकाळी वृत्तपत्र वाचल्यानंतर अर्थमंत्र्यांना व्याज कपातीसंदर्भातील माहिती मिळाली असावी’
- चेन्नईला या सत्रातही संघर्ष करावा लागणार; आकाश चोप्राचे मोठे भाष्य
- ‘या’ गावात गावकऱ्यांची पाण्यासाठी मरमर
- ‘…की, निवडणुका लक्षात घेता व्याजकपात करण्याचा निर्णय मागे घेत आहात ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

