मुंबई : ‘आई माझी काळुबाई’ हि महिला सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. मालिका सुरु झाली तेव्हा या मालिकेच्या सेटवरील सर्व कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. नंतर हि मालिका वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यात वाद चांगलाच पेटला होता. प्राजक्ताने या मालिकेतून माघार घेतल्यानंतर हा वाद पेटला होता.
प्राजक्ता गायकवाडने सेटवरती शिवीगाळ झाली असून मी ही मालिका सोडली आहे. असं म्हणत या मालिकेतून माघार घेतली होती. प्राजक्ता गायकवाडला या मालिकेतून काढून टाकल्याच्या अफवा पसरत होत्या परंतु प्राजक्ताने पत्रकार परिषद घेऊन मला मालिकेतून काढून काढलं नसून मी हि सोडली असल्याचं सांगितलं होत.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं ही मालिका सोडल्यानंतर आता अभिनेत्री वीणाने देखील हि मालिका सोडली आहे. आजारी असल्यानं तिनं ही मालिका सोडल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच आता रश्मी आर्याच्या भूमिका साकारणार आहे. विणा या मालिकेत आर्याची भूमिका साकारत होती मात्र, आता वीणा जगतापने देखील ही मालिका सोडली असून आता मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : ‘या’ तालुक्यात आजपासून १० दिवस कडक जनता कर्फ्यु…
- ‘सकाळी वृत्तपत्र वाचल्यानंतर अर्थमंत्र्यांना व्याज कपातीसंदर्भातील माहिती मिळाली असावी’
- चेन्नईला या सत्रातही संघर्ष करावा लागणार; आकाश चोप्राचे मोठे भाष्य
- ‘या’ गावात गावकऱ्यांची पाण्यासाठी मरमर
- ‘…की, निवडणुका लक्षात घेता व्याजकपात करण्याचा निर्णय मागे घेत आहात ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

