Share

‘नजरचुकीने झालेली चूक १२ तासात सुधारली पण ‘ती’ घोडचूक कधी सुधारणार ?’

Published On: 

मुंबई : गेल्या वर्षभरापासून राज्यासह देशातील जनतेवर कोरोना महामारी मुळे उद्भवलेल्या परिस्थिती मध्ये लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांच्या हाताचा रोजगार गेला. तर मध्यमवर्गीयांवर महागाई आणि आर्थिक कपातीची कुऱ्हाड पडली असताना त्यात नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लघु बचत योजनेवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने संकट उभे राहिले होते.

मात्र त्यांनतर केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. सीतारमण यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. या ट्विटनंतर कोट्यावधी लोकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. त्यामुळे आता भारत सरकारच्या लहान बचत योजनांचे व्याज दर 2020-2021 च्या शेवटच्या तिमाहीत उपस्थित असलेल्या दरावर राहतील.

यावर स्पष्टीकरण देताना अर्थमंत्र्यांनी नजर चुकीने हा आदेश देण्यात आल्याचे सांगितलं आहे. यावरून विरोधकांनी सीतारमण रह मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यामध्ये आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील टीकास्त्र सोडले आहे.

तसेच पाच राज्यातील निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणूनही तात्पुरता हा निर्णय मागे घेतलेला असू शकतो. नजरचुकीने झालेली चूक १२ तासात सुधारली असली तरी सात वर्षापासून पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती वाढवण्याची केलेली ‘घोडचूक’ मोदी सरकार कधी सुधारणार? असा सवाल त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!