Share

कोरोना उपचार केंद्रांची संरचनात्मक व अग्निप्रतिबंधात्मक तपासणी; खाटांची संख्या वाढणार

Published On: 

मुंबई : मुंबईतील भांडूप मधील ड्रीम्स मॉलमधील सनराईझ या रुग्णालयात काही दिवसापूर्वी आग लागली होती. या मॉलमध्ये सनराईझ रुग्णालय चालवले जात होते. त्या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. या आगीत त्याच इमारतीमधील कोरोना रुग्णालयातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या अग्निकांडात ड्रीम्स मॉल मधील सर्व दुकाने जळून खाक झाली होती.

या आगीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने खबरदारी म्हणून सर्व रुग्णालये आणि कोरोना उपचार केंद्रांची संरचात्मक व अग्निप्रतिबंधात्मक तपासणी करून घ्यावी, असे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नुकतेच दिले आहेत.

मुंबई सह राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे पालिका प्रशासनाने खाटांची संख्या वाढवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सध्याच्या रुग्णशय्यांची क्षमता वाढवून ती एकूण २० हजारांहून अधिक करण्यात येत आहे. कोरोनाची लक्षणे नसलेल्या, तसेच दीर्घकालीन आजार नसलेल्या बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेता येणार नाही. तर सर्व खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांतील खाटांचे नियोजन आता विभाग कार्यालयांतील नियंत्रण कक्षातूनच केले जाणार असल्याच चहल यांनी स्पष्ट केले आहे.

पालिका आयुक्तांनी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा, कृत्रिम श्वास उपकरणे तसेच इतर आवश्यक उपकरणांची पुन्हा पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच या सर्व निर्देशांबरोबर कोरोना उपचार केंद्रांच्या संरचनात्मक तपासणीचेही निर्देश देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!