उस्मानाबाद: राज्यात मागील काही दिवसांपासून लाचखोरीचे प्रमाण वाढत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना मध्ये वाढते प्रमाण प्रशासनसाठी कन्येचा विषय ठरत आहे. अशीच एक लाच घेण्याची घटना उस्मानाबाद येथे घडली. रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचे बील काढण्यासाठी दलालामार्फत २ हजार रुपयाची लाच घेणाऱ्या कळंब पंचायत समितीच्या लाचखोर कंत्राटी अभियंत्यासह दलालास रंगेहात पकडण्यात आले आहे. कळंब पंचायत समिती कार्यालय परिसरात बुधवारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
एसीबीच्या या कारवाईमुळे कळंब पंचायत समितीमधील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला असून शासकीय कार्यालयातील अधिकारी सर्वसामान्य जनतेची कशी अडवणूक व आर्थिक पिळवणूक करतात हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.तक्रारदार यांना रमाई आवास योजने अंतर्गत घरकूल मंजूर झाले होते. त्यांच्या घराचे बांधकाम बेसमेंट लेवलपर्यंत पूर्ण झाले होते. त्यामुळे बांधकामाच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे बील काढण्यासाठी तक्रारदार यांनी पंसच्या बांधकाम विभागातील कंत्राटी ग्रामीण गृह निर्माण अभियंता शशिकांत अंगद टेकाळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी घरकुल योजनेंतर्गत बील काढण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे २ हजार रुपयाची लाच मागितली.
त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. एसीबीचे उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी एसीबीच्या पथकाने कळंब पंचायत समितीच्या कार्यालयात सापळा रचला होता. दरम्यान, कंत्राटी अभियंता टेकाळे यांनी पंचासमक्ष २ हजार रुपयाची मागणी करून खाजगी व्यक्ती राहुल प्रताप राणे याच्यामार्फत लाच स्विकारली. यावेळी एसीबीच्या पथकाने त्या दोघांना लाचखोरी करताना रंगेहात पकडून ताब्यात घेतले.
महत्वाच्या बातम्या
- स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी ‘ही’ सेवा आज राहणार बंद
- ‘सकाळी वृत्तपत्र वाचल्यानंतर अर्थमंत्र्यांना व्याज कपातीसंदर्भातील माहिती मिळाली असावी’
- चेन्नईला या सत्रातही संघर्ष करावा लागणार; आकाश चोप्राचे मोठे भाष्य
- ‘या’ गावात गावकऱ्यांची पाण्यासाठी मरमर
- ‘…की, निवडणुका लक्षात घेता व्याजकपात करण्याचा निर्णय मागे घेत आहात ?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
