🕒 1 min read
नवी दिल्ली : पेट्रोलच्या दराने अनेक शहरांत शंभरी पार केली आहे. विरोधकांकडून इंधनाचे दर कमी करण्याची मागणी होत आहे. केंद्र सरकारकडून मात्र याबाबत मौन बाळगले जात असून केंद्रीय मंत्र्यांसह भाजप नेत्यांकडून राज्यांकडे बोट दाखवले जात आहे.
मागील काही महिन्यांपासून देशात पेट्रोल व डिझेलच्या दर सातत्याने वाढत आहेत. पाच राज्यांतील निवडणुकांच्या कालावधीत दरवाढ थांबली होती. पण निवडणुका झाल्यानंतर दुसऱ्या दिवसांपासून जवळपास दररोज दर वाढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचा प्रति लिटर शंभर रुपयांहून अधिक झाला आहे. तसेच डिझेलचे दरही वाढत असून अनेक राज्यांत हे तर प्रति लिटर 90 ते 95 रुपयांपर्यंत पोहचलेत.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोलच्या दरवाढीवरुन केंद्रावर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्यावर पलटवार करण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रात देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर आहेत. या राज्यात काँग्रेस सत्तेत आहे त्यामुळे राहुल गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पेट्रोलचे दर कमी करण्यास सांगावं, असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.
Rahul Gandhi must answer why fuel prices are high in Congress-ruled states like Punjab, Rajasthan, & Maharashtra. If he is so concerned about the poor, he should instruct Maharashtra CM to reduce taxes as prices are very high in Mumbai: Union Petroleum Minister Dharmendra Pradhan pic.twitter.com/rSTq9QSIKl
— ANI (@ANI) June 13, 2021
प्रधान म्हणाले, ‘राहुल गांधींनी अशा प्रकारची बेजबाबदार विधानं करु नयेत. पहिल्यांदा त्यांनी याचं उत्तर द्यावं की, काँग्रेसशासित राज्यांमध्ये जसे पंजाब, राजस्थान आणि महाराष्ट्रात पेट्रोलचे दर जास्त का आहेत? जर राहुल गांधी यांना गरीबांचा इतकाच कळवळा असेल तर त्यांनी ज्या महाराष्ट्रात देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर आहेत तिथले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पेट्रोलवरील कर कमी करण्याच्या सूचना कराव्यात.
महत्वाच्या बातम्या
- ‘आम्ही कुठं म्हणतोय मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत!’, संजय राऊतांच्या वक्तव्याने खळबळ
- ‘गोपीनाथ मुंडेंचे नाव घ्यायचे, मतं मागायची, असे यापुढे होणार नाही’, धनंजय मुंडेंनी पंकजांना सुनावले
- ‘आमचे आंदोलन मूक नसून बोलके असणार’, विनायक मेंटेंची खा.संभाजीराजेंना कोपरखळी
- ‘जनगणना न केल्याने ओबीसींचे नुकसान’, छगन भुजबळ यांचा आरोप
- भाजपला धक्का! तब्बल १५ नेत्यांचा पक्षाला रामराम, काय आहे प्रकरण जाणून घ्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

