🕒 1 min read
नवी दिल्ली : भाजपचे खासदार दिलीप घोष यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत एक वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान केलं आहे. काही दिवसांपूर्वी दिलीप घोष यांनी पवारांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे वादग्रस्त विधान केल होते. आता पुन्हा एकदा त्यांनी पवारांबाबत वादग्रस्त विधान केले आहे. “पवारांसारखे राष्ट्रपती आपल्या देशाला मिळाल्यास दहशतवाद वाढेल,” असे घोष म्हणाले आहेत. तसेच त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही निशाणा साधला आहे. घोष यांच्या या वादग्रस्त विधानानंतर देशाभरातील विविध राज्यात राजकीय वाद उभा निर्माण होण्याची शक्यता आहे.
दिलीप घोष म्हणाले की, ‘दीदींना असं वाटतं की, सगळ्यांनी पवारांशी एकदा बोललं तर ते राष्ट्रपती पदासाठी मान्य होतील. मात्र, याबाबत कुणीच बोलायला तयार नसल्याचे ते म्हणाले. काल राष्टपती निवडणुकीबाबतच्या रणनीतीसाठी ममता बनर्जी यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठक बोलावली होती. यामध्ये विविध १६ पक्ष सहभागी झाले होते.
दरम्यान येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांनी यापूर्वीच नकार दर्शवला आहे. आपल्याला राष्ट्रपती होण्यास स्वारस्य नसल्याचे पवारांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. “मी अजून राजकारणात सक्रिय आहे.” असं सांगत पवारांनी राष्ट्रपतीपदाची ऑफर नाकारल्याचे समजात आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
