🕒 1 min read
मुंबई : न्यूझीलंड क्रिकेट संघात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरूच आहे. त्यांच्या टीममधील आणखी एक खेळाडू पॉझिटिव्ह आढळला आहे. डावखुरा फलंदाज डेव्हॉन कॉनवेला कोरोनाची लागण झाली आहे. कॉनवेने पाच दिवसांची आयसोलेशन प्रक्रिया सुरू केली आहे. यापूर्वी, अष्टपैलू क्रिकेटपटू मायकेल ब्रेसवेल आणि सपोर्ट स्टाफ फिजिओ विजय वल्लभ आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक ख्रिस डोनाल्डसन यांनाही कोरोनाची लागण झाली. या सर्वांनाही आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या अंतिम कसोटीसाठी (ENG vs NZ) न्यूझीलंडने डेव्हॉन कॉनवेच्या कोणत्याही बदलीची घोषणा केलेली नाही. ”बुधवारी संध्याकाळी लंडनमध्ये आल्यावर कॉनवेने पीसीआर चाचणी केली होती”, असे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सांगितले. दोन्ही संघांमधील शेवटचा कसोटी सामना २३ जूनपासून खेळवली जाईल.
JUST IN: New Zealand batter Devon Conway has tested positive for #COVID19 on the team's arrival in London.
— Cricbuzz (@cricbuzz) June 16, 2022
इंग्लंड दौऱ्यावर असेलेल्या किवी संघाला तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. लॉर्ड्सवर इंग्लंडने पाच गडी राखून विजय मिळवला. दुसरीकडे ट्रेंट ब्रिजवर यजमानांनी जॉनी बेअरस्टोच्या झंझावाती शतकाच्या जोरावर विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील अंतिम सामना २३ जूनपासून लीड्समध्ये खेळवला जाणार आहे. न्यूझीलंडने मालिका गमावली असली तरी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी आवश्यक असलेले गुण मिळविण्यासाठी अंतिम कसोटी जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
