Share

‘सत्ता नसल्याने फडणवीस अस्वस्थ, सरकार स्थापनेसाठी ते तळमळत आहेत’, खडसेंची कोपरखळी

Published On: 

मुंबई : राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजप नेते देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी त्यांची तळमळ सुरूच आहे असा टोला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. अस्वस्थ फडणवीस यांनी सत्तेसाठी अजित पवारांसोबत सरकार स्थापन केले होते. भले त्यांना आता चूक वाटत आहे. पण आजही सरकार स्थापन करण्याची त्यांची तळमळ दिसत आहे, अशी कोपरखळी खडसे यांनी मारली.

एकनाथ खडसे यांनी यावेळी वारंवार सरकार पडणार असल्याच्या वक्तव्याच्या समाचार घेत भाजपा नेत्यांना टोला लगावला. ‘आमचं सरकार येणार हे, थोडे दिवस थांबा हे सरकार पडणार आहे अशा स्वरुपाचं आमदारांना सांगून दिवस काढत आहेत,’ अशी टीका त्यांनी केली.

खडसे म्हणाले, भाजप आमदारांमध्ये किती अस्वस्थता आहे हे मला माहिती आहे. कारण मीच त्यातील अनेकांना प्रवेश तसंच तिकिट दिलं होतं. माझ्याशी ते मोकळेपणाने बोलतात. जी कार्यपद्धती आहे त्याबद्दल नाराजी जाहीर करतात. असे लोक पक्षाबाहेर जाऊ नये किंवा नाराजांची संख्या वाढू नये त्यासाठी कदाचित अशी वक्तव्यं केली जात असतील.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!