Share

‘सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी झाल्यास थेट जिल्हाधिकाऱ्यांवरच कारवाई’, मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर अनलॉक झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसह यंत्रणांकडून मोठी बेफिकरी झाली होती. या पार्श्वभूमीवर आता दुसऱ्या लाटेनंतरच्या अनलॉक प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सावध भूमिकेत असून त्यांनी प्रशासनाला आक्रमक सूचना दिल्या आहेत.

ब्रेक दि चेनमध्ये निर्बंधांबाबत निकष आणि पातळ्या निश्चित करणाऱ्या ४ जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा समज निर्माण झाला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा असंही स्पष्ट केले.

 थेट जिल्हाधिकाऱ्यांवरच कारवाई

कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक द चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या आहेत, त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथिल केलेले नाहीत. कोणत्याही पातळीवर कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, नाहीतर थेट जिल्हाधिकाऱ्यांवरच कारवाई केली जाईल, या शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची हजेरी घेतली.

दबावाला बळी पडू नका

कोरोना रुग्णाच्या संख्येत चढ उतार होत असतात. आपण स्तर ठरविले असले तरी संसर्ग किती वाढेल याविषयी आपल्या मनात शंका असतील तर व्यवहारांवर निर्बंध घाला. कुठल्याही दबावाला बळी पडू नका, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, निर्णयाचा अधिकार सर्व स्थानिक जिल्हा प्रशासनांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!