पुणे : पुढच्या वर्षी औरंगाबाद, मुंबईसह दहा महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन प्रभाग रचना बदलाचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ‘मुंबई महापालिकेत एक वॉर्ड पद्धत आहे. तर पुणे शहरात चार वॉर्ड पद्धत आहे. युती सरकारमध्ये त्यांना जे योग्य वाटले त्यानुसार त्यांनी वॉर्ड रचना केली. आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. आम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय घेतला जाईल. पुण्याबाबत विचार केल्यास माझ्या वैयक्तिक मत दोन सदस्यीय वॉर्ड असावा. मात्र या बाबतचा अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते घेतील’ असे पवार म्हणाले.
२०१७ च्या महापालिका निवडणुकांवेळी तत्कालीन फडणवीस सरकारने सध्याची चार सदस्यीय प्रभाग रचना केली होती. यामुळे विकासकामांना खीळ बसते अशी सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांची ओरड आहे. तसेच चार सदस्यीय प्रभाग रचनेचा लाभ मागच्या निवडणुका भाजपला झाला होता, असा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे.
त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. चार सदस्यीय प्रभाग रचनेच्या बदलामुळे राष्ट्रवादीची पुणे महापालिकेतील सत्ता गेली, असे राष्ट्रवादीचे नेते दावा करत आहेत.
तिन्ही पक्ष मिळून निर्णय घेणार
एक सदस्यीय प्रभाग का दोन याचा निर्णय अजून झाला नाही. यापूर्वी १-२-३ सदस्यीय असे झाले आहे. तेव्हा वेगळी सरकारं होती. आता तिन्ही पक्ष बघु आणि निर्णय घेऊ असेही पवार यांनी सांगितले.
प्रभाग रचनेत हस्तक्षेप करणार-संजय राऊत
मागील महापालिका निवडणुकीत भाजपाने प्रभाग रचनेत राजकारण करून हस्तक्षेप केला असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आता आमचे सरकार आहे त्यामुळे प्रभाग रचना, वॉर्ड रचनेत आम्हीही हस्तक्षेप नक्की करू असे राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- न्युझीलंड विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना अनिर्णीत
- पदार्पणातच कारकिर्द संपुष्टात! ओली रॉबीन्सन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निलंबीत
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- चोराच्या उलट्या बोंबा : मी उपचारासाठी देश सोडला; पळून गेलेलो नाही – चोक्सी
- 12 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीला राज्यात प्रारंभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

