Share

न्युझीलंड विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना अनिर्णीत

Published On: 

मुंबई : इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड दोन्ही संघात लॉर्ड्स येथे सुरु असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. आखेरच्या दिवशी न्युझीलंडच्या संघाने ६ बाद १६९ धावांवर डाव घोषीत केला. चौथ्या डावात इंग्लंड समोर २७३ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा संघ ३ बाद १७० धावापर्यंत मजल मारु शकला. न्युझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

लॉर्ड्स कसोटीत पहिल्या दिवसापासुन न्युझीलंडने वर्चस्व गाजवले होते. सामन्याच्या पहिल्या दिवशी न्युझीलंड कडुन पदार्पण करणारा सलामीवीर डेवॉन कॉनवेने पहिल्याच सामन्यात शतकी खेळी करत इंग्लंडला बॅकफुटवर ढकलले. दुसऱ्या कॉनवेने झळकावलेल्या द्विशतकाच्या आधारे न्युझीलंडच्या संघाला ३७८ धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. सामन्याच्या चौथ्या दिवशी न्युझीलंडच्या गोलंदाजानी इंग्लंडच्या संघाला २७५ धावात गुंडाळले आणि निर्णायक १०३ धावांची आघाडी घेतली. या डावात इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्सने १३२ धावांची शतकी खेळी केली.

यानंतर पाचव्या दिवशी न्युझीलंडच्या संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना ६ बाद १६९ धावांवर डाव घोषीत केला आणि पहिल्या डावातील १०३ धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर २७३ धावांचे लक्ष्य ठेवले. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडच्या संघाने ३ गडी गमावत १७० धावापर्यंत मजल मारली आणि सामना अनिर्णीत राहिला. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सलामीवीर डॉमनिक सिब्लीने सर्वाधिक ६० धावांची नाबाद खेळी साकारली. द्विशतकवीर डेवॉन कॉनवेला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!