🕒 1 min read
मुंबई : नेत्रचिकित्सक डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या नेत्रालयाचा उद्घाटन समारंभ मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अनेक दिग्गज नेते व्यासपिठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार टोलेबाजी केली. शरद पवारांकडे राजकीय लेन्सेस आहेत, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
पंकजा मुंडे यांनी लेन्स शब्दावरून यावेळी चांगलीच टोलेबाजी केली. “मुंडे-महाजनांच्या लेन्सेसमधून स्वत:ला मोठ करत करत, आज शरद पवार साहेबांच्या लेन्सेसमधून पाहण्याच भाग्य खूप कमी लोकांना लाभल ते म्हणजे आमचे बंधू धनंजय मुंडे. शरद पवार यांच्याकडे राजकीय लेन्सेस आहेत आणि आमचे बंधू त्यांच्या लेन्समधून पाहतात, असे बोलत त्यांनी टोला लगावला.
पंकजा मुंडेंनी लेन्सवरून डिवचल्यानंतर धनंजय मुंडे यांनीही मिश्कील स्वरुपात उत्तर दिले. धनंजय मुंडे म्हणाले की, पंकजा ताईंनी लेन्सेस बदलल्या आणि महाविकास आघाडीच्या लावल्या तर? असा सवाल त्यांनी केला. तसेच बहिण भावाचं राजकीय वैर जगाला माहिती आहे, पण काही व्यक्तींसाठी आमचं वैर काहीच नाही”, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या –


