मुंबई : नेत्रचिकित्सक डॉक्टर तात्याराव लहाने यांच्या नेत्रालयाचा उद्घाटन समारंभ मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी अनेक दिग्गज नेते व्यासपिठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जोरदार टोलेबाजी केली. शरद पवारांकडे राजकीय लेन्सेस आहेत, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले.
पंकजा मुंडे यांनी लेन्स शब्दावरून यावेळी चांगलीच टोलेबाजी केली. शरद पवार यांच्याकडे राजकीय लेन्सेस आहेत आणि आमचे बंधू त्यांच्या लेन्समधून पाहतात, असे बोलत त्यांनी टोला लगावला.
पुढे बोलताना उपस्थितीत असलेल्या मान्यवरांचा लेन्सेस सोबत उल्लेख केला, “ज्या व्यक्तीच्या अनुभवाच्या राजकीय दृष्टीच्या लेन्सेस चांगल्या आहेत…असे माननीय शरद पवार, ज्यांच्या लेन्सेस सर्वांना सूट करतील, जे सोबर, प्रेमळ वागतात, असे बाळासाहेब थोरात.. एक नवीन चेहरा, ज्यांच्याकडून इतरांना दृष्टी मिळण्याची अपेक्षा आहे. ज्यांच्या लेन्सेसकडे युवक पहात आहेत असे आदित्य ठाकरे… आमचे शेजारी विलासराव देशमुख आणि मुंडे यांच्यातील मैत्रीची परंपरा असलेल… अमित देखमुख.. मुंडे-महाजनांच्या लेन्सेसमधून स्वतःला मोठं करत पवार साहेबांच्या लेन्सेसमधून बघणारे.. पवार साहेबांच्या लेन्समधून बघण्याचं भाग्य खूप कमी लोकांना लाभलंय… असे धनंजय मुंडे..माझ्या लेन्समधून बघत, काम करणाऱ्या पण खूप मेरीट असणाऱ्या भगिनी खा. प्रीतम मुंडे” असे बोलत पंकजा मुंडे यांनी मनोरंजन केले.
महत्वाच्या बातम्या –

